अभिनेता शेखर सुमन सध्या ‘हीरामंडी-द डायमंड बझार’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. या शोमध्ये त्यांचा मुलगा, अभिनेता अध्ययन सुमनदेखील नवाब जोरावर या सहायक भूमिकेत झळकला आहे. ‘हीरामंडी’च्या प्रमोशनदरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी, लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफच्या इंडस्ट्रीमधील सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली आणि तिच्याकडून अध्ययन प्रेरणा घेऊ शकतो, असंही त्याला सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेखर सुमन आणि त्यांचा मुलगा अध्ययन सुमन यांनी नुकतीच ‘बॉलीवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान दोघांनी त्यांच्या ‘हीरामंडी’मधील भूमिकांबद्दल सांगितलं. अध्ययननं सांगितलं की, त्याचा इंडस्ट्रीमध्ये कसा टिकाव लागत नव्हता; पण तरीही या वेब सीरिजमधील त्याच्या अभिनयातून त्यानं यशस्वीरीत्या एक पाऊल पुढे टाकलं.

हेही वाचा… “अंगारो सा…” ‘पुष्पा २’ मधील गाण्यावर ‘पारू’ फेम शरयू, पूर्वा आणि प्रसादचा हटके डान्स, कलाकारांच्या हूकस्टेपने वेधलं लक्ष

त्यावर शेखर यांनी अध्ययनला बॉलीवूडमधील काही कलाकारांची उदाहरणं दिली आणि त्यांचे सुरुवातीचे दिवस कसे होते आणि स्ट्रगल करून ते कसे आता यशोशिखरावर आहेत याबद्दल सांगितलं. शेखर सुमन अध्ययनला म्हणाले, “इतर लोकांच्या प्रवासाचा अंदाज घे. कतरिना कैफकडे बघ. जेव्हा ती प्रसिद्धीझोतात आली तेव्हा तिला साध नीट उभं राहता येत नव्हतं आणि तिला तिचे डायलॉग्सही नीट बोलता येत नव्हते. तिला नीट डान्सही करता येत नव्हता. पण, आता तिच्याकडे बघ ती कुठे पोहोचलीय. तिचा ‘राजनीती’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ किंवा ‘धूम-३’मधला परफॉर्मन्स बघ. तू सांगूच शकत नाहीस की, ही तीच मुलगी आहे; जिला सुरुवातीला एवढ्या सगळ्या अडचणींना सामोरं जाव लागलं होतं. हे सगळं चांगल्या लोकांबरोबरच घडतं.”

शेखर सुमन यांनी इंडस्ट्रीमधील आणखी काही कलाकारांची उदाहरणं दिली. शेखर सुमन पुढे म्हणाले, “दीपिका पदुकोणचाही प्रवास बघ. तीही एक सुंदर अभिनेत्री बनली आहे. अनन्या पांडेला तर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला; पण ‘खो गये हम कहा’ चित्रपटानंतर सगळं दृश्य पालटून गेलं.”

हेही वाचा… हातात हात अन्…, जान्हवी कपूरने शेअर केला शिखर पहारियाबरोबरचा रोमॅंटिक फोटो, अभिनेत्री म्हणाली…

दरम्यान, ‘हीरामंडी’चा दुसरा सीजनदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये शेखर सुमननं नवाब झुल्फिकरची भूमिका साकारली आहे; तर अध्ययनने नवाब जोरावरची भूमिका साकारली आहे. ही वेब सीरिज ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहोरमधील हीरामंडीच्या रेड-लाइट जिल्ह्यातील तवायफ स्त्रियांच्या (वेश्यांच्या) जीवनावर आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजिदा शेख, शर्मिन सेगल मेहता आदी कलाकार आहेत. या वेब सीरिजचा पहिला सीजन १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This famous actor said katrina kaif couldnt stand properly or say a line dvr
Show comments