Thriller Action Movies On Netflix: तुम्हाला ओटीटीवर चित्रपट पाहण्याची आवड असेल आणि सध्या चांगल्या एंटरटेनिंग चित्रपटांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही सिनेमांची नावं सांगणार आहोत. प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार यांसारख्या अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला आणि महिन्याला अनेक नवीन चित्रपट आणि नवीन सीरिज रिलीज होतात. अशातच आता आम्ही तुम्हाला पाच सर्वोत्कृष्ट ॲक्शन-थ्रिलर चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, हे तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येतील. या यादीत तमन्ना भाटियाच्या ‘सिकंदर का मुकद्दर’ ते ‘ब्लड मनी’चा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिकंदर का मुकद्दर

Sikandar Ka Muqaddar on Neflix : जिमी शेरगिल, अविनाश तिवारी व तमन्ना भाटिया यांचा चित्रपट ‘सिकंदर का मुकद्दर’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. लोकांना हा थ्रिलर-ॲक्शन चित्रपट आवडला आहे. हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे. या सिनेमाची कथा हिऱ्यांच्या चोरीभोवती फिरते, ज्यामध्ये तुम्हाला सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲक्शन पाहायला मिळेल.

हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक

खुफिया

Khufiya on Netflix: तब्बू, अली फजल व वामिका गब्बी यांच्या भूमिका असलेला स्पाय थ्रिलर ‘खुफिया’ हा गेल्या वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला एक अतिशय मनोरंजक चित्रपट आहे. यामध्ये काही लोक सीमेवर राहून देशसेवा करतात, तर काही परदेशात जाऊन कर्तव्य बजावत असल्याचे पाहायला मिळते. विशाल भारद्वाज दिग्दर्शित हा थ्रिलर-ॲक्शन चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.

हेही वाचा – “मागील काही वर्षे खूपच…”, अभिनेता विक्रांत मॅसीने केली निवृत्तीची घोषणा? म्हणाला, “शेवटचे दोन चित्रपट अन्…”

चोर निकल के भागा

Chor Nikal Ke Bhaga on OTT : सनी कौशल व यामी गौतम यांचा हा क्राइम थ्रिलर चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा फ्लाइट अटेंडंट आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर आधारित आहे. अभिनेत्री एक्स बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी फ्लाइटमध्ये एक कट रचते. पुढे काय घडतं, ते तुम्हाला यात पाहता येईल. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा

ब्लड मनी

Blood Money on Netflix : कुणाल खेमू आणि अमृता पुरी यांच्या मुख्य भूमिका हा चित्रपट नेटफ्लिक्सवर देखील उपलब्ध आहे. यात एक प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. २०१३ मध्ये रिलीज झालेला हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट लोकांना खूप आवडला होता.

मद्रास कॅफे

Madras Cafe on OTT : २०१३ मध्ये रिलीज झालेल्या या थ्रिलर-ॲक्शन चित्रपटात जॉन अब्राहम, राशी खन्ना यांच्यासह अनेक कलाकार आहेत. यात अभिनेता एका रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. तो एका मिशनसाठी श्रीलंकेला जातो. तिथे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते हेही पाहिले जाते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thriller action movies on netflix madras cafe blood money chor nikal ke bhaga khufiya sikandar ka muqaddar on ott hrc