South Movies on OTT: तुम्हाला दाक्षिणात्य पाहायला आवडत असतील तर ओटीटीवर तुमच्यासाठी अनेक उत्तम चित्रपट उपलब्ध आहेत. तुम्ही ओटीटीवरील अनेक हिंदी चित्रपट पाहिले असतील, पण अनेक दाक्षिणात्य चित्रपट ओटीटीवर गाजले आहेत. तुम्हाला या सिनेमांमध्ये भरपूर ॲक्शन पाहायला मिळते. आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांची नावं सांगणार आहोत, जे तुम्ही घरी बसून पाहू शकता. यामध्ये विजय सेतुपती यांच्या ‘महाराजा’ या नुकत्याच आलेल्या चित्रपटाचा समावेश आहे.
महाराजा
विजय सेतुपतीचा ‘महाराजा’ सस्पेन्सने भरलेला आहे. या चित्रपटाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आणि जेव्हा तो ओटीटीवर आल्यावर त्याची खूप चर्चा झाली. चित्रपटाची कथा आणि विजय सेतुपती यांचा अभिनय अतिशय उत्तम आहे. तुम्हाला तो पाहायचा असेल तर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
ब्रह्मयुगम
‘ब्रह्मयुगम’ हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर परदेशातही गाजला. थरार व रहस्याने भरलेला हा चित्रपट हिट ठरला. मामूटी यांचा हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर सोनी लिव्ह वर पाहू शकता. २३ कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमाने ६० कोटींची कमाई केली होती.
धाडस असेल तरच पाहा मन हेलावणारे OTT वरील ‘हे’ तीन चित्रपट, एकावर घालण्यात आली होती बंदी!
कांतारा
थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं. ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कंतारा’ ओटीटीवर खूप पाहिला गेला. तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल तर नक्की पहा. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
हेडफोनशिवाय बघू नका OTT वरील ‘हे’ चित्रपट, बोल्ड कंटेटचा आहे भडीमार
इरुल
फहाद फासिल, सौबिन शाहीर व दर्शन राजेंद्रन यांचा हा चित्रपट सस्पेन्सने भरलेला आहे. कथा एका भयंकर रात्री घडते. यातील मुख्य पात्र एका हवेलीत अडकलेले असतात, त्यानंतर काय घडलं ते चित्रपटात पाहायला मिळतं. तुम्हाला सस्पेन्स थ्रिलरची आवड असेल तर हा चित्रपट नक्की पहा. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
अभिनेत्री सोभिता धुलीपाला-नागा चैतन्यच्या साखरपुड्याचे Unseen Photos पाहिलेत का?
विक्रम वेधा
‘विक्रम वेधा’ मध्ये विजय सेतुपती आणि आर माधवन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनला, ज्यात हृतिक रोशन व सैफ अली खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या. बॉलीवूडचा ‘विक्रम वेधा’ हा या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. दोन्ही चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहेत.