‘लस्ट स्टोरीज २’ व ‘त्रिभुवन मिश्रा: सीए टॉपर’ अशा वेब सीरिजसह अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे तिलोत्तमा शोम (Tillotama Shome) होय. आपल्या अभिनयाबरोबरच ती स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. आता तिने तिच्याबरोबर घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला आहे. तिलोत्तमाला राजधानी दिल्लीत हा भयंकर अनुभव आला होता.

दिल्लीत एक कार जवळ येऊन थांबली अन्…

“मी दिल्लीत एके ठिकाणी बसची वाट पाहत थांबले होते. थंडीचे दिवस होते आणि अंधार पडला होता. त्याचवेळी एक कार माझ्या जवळ येऊन थांबली, त्या कारमध्ये सहा जण होते. त्यांना पाहून मला अस्वस्थ वाटलं आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मी तिथून थोडी दूर गेले. नंतर त्यांनी माझ्याकडे पाहून विचित्र हावभाव करायला सुरुवात केली, तसेच कोणीतरी माझ्यावर एक छोटा दगड फेकला. त्याचवेळी मला लक्षात आलं की मी आता इथून निघायला हवं. मी तिथून पळण्याचा विचार केला, पण ते कारमध्ये होते, त्यामुळे मला सहज पकडू शकले असते. मग मी रस्त्याच्या मधोमध उभं राहून मदत मागायचं ठरवलं,” असं ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत तिलोत्तमा शोम (Tillotama Shome horrible experience) म्हणाली.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”

“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग

त्या गाडीत तिलोत्तमा शोमला आला धक्कादायक अनुभव

“त्यानंतर खूप गाड्या त्या रस्त्यावरून गेल्या, मग मला मेडिकल साइन असलेली एक कार दिसली. मला वाटलं की डॉक्टरची गाडी असल्याने मी सुरक्षित राहीन. मी त्या गाडीत पुढच्या सीटवर बसले. पण काही वेळाने गाडीच्या ड्रायव्हरने त्याच्या पँटची चैन उघडली आणि माझा हात पकडला. त्याने जबरदस्ती माझा हात त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला, पण माझा हात आपोआप झटक्यात मागे गेला. यानंतर तो ड्रायव्हर गोंधळला. त्याने गाडी थांबवली आणि मला खाली उतरण्यास सांगितलं,” असा भयंकर अनुभव तिलोत्तमा शोमने सांगितला.

“मी खूप घाबरले होते, पण तो…”, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितलेला सनी देओलबरोबर किसिंग सीनचा अनुभव

या घटनेचा आपल्यावर खोलवर परिणाम झाला, असं तिलोत्तमाने सांगितलं. “हा एक भयानक अनुभव होता आणि मी हादरले होते. पण विरोध केल्यामुळे मी एका भयंकर परिस्थितीतून बाहेर पडू शकले होते. या घटनेनंतर मी घरी न जाता मैत्रिणीकडे गेले होते,” असं तिलोत्तमा शोम म्हणाली.

Tillotama Shome delhi experience
अभिनेत्री तिलोत्तमा शोम (फोटो – इन्स्टाग्राम)

आयटम साँगबद्दल तिलोत्तमा म्हणाली…

यावेळी तिलोत्तमाने चित्रपटातील आयटम साँगबद्दल तिचं मत मांडलं. अशी गाणी पाहून मी अस्वस्थ होते, खासकरून जेव्हा लहान मुलं अशा गाण्यांची नक्कल करतात तेव्हा मला वाटतं की यांचं बालपण आपण हिरावतोय, असं तिलोत्तमाने नमूद केलं.

Story img Loader