Time Travel Movies On OTT: विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे चित्रपट उपलब्ध आहेत. ॲक्शन, थ्रिलर, सायन्स फिक्शन सिनेमेही ओटीटीवर पाहायला मिळतात. तुम्हालाही जर असे चित्रपट पाहायचे असतील तर आम्ही आज तुम्हाला पाच सिनेमांची नावं सांगणार आहोत. या चित्रपटांमध्ये टाइम ट्रॅव्हल पाहायला मिळते. यापैकी काही सिनेमांचे क्लायमॅक्स पाहून तुमचं डोकं चक्रावेल.
ब्लिंक
Blink on OTT: या यादीत पहिले नाव ‘ब्लिंक’ चित्रपटाचे आहे. कन्नड भाषेतील हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. २०२४ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. श्रीनिधी बेंगळुरू दिग्दर्शित या चित्रपटाची कथा खूप चांगली आहे. यात अपूर्व नावाच्या एका मुलाला दोन लोक दिसतात. यापैकी एक हुबेहुब त्याच्यासारखा दिसतो, तर दुसरा म्हातारा असतो. त्यानंतर त्याला एक वस्तू सापडते. ज्याच्या मदतीने तो टाइम ट्रॅव्हल करू शकतो. जोपर्यंत त्याच्या डोळ्याची पापणी हलत नाही, तोपर्यंतच तो भूतकाळात जोऊ शकतो. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
कॉल
Call on OTT: २०२० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट कोरियन सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. यात एक फोन दोन लोकांना कनेक्ट करतो. यापैकी एक जण वर्तमानात आणि दुसरा भूतकाळात आहे. या चित्रपटात तुम्हाला दोन जग एकत्र पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे काय घडते हे खूप मनोरंजक आहे. तुम्ही हा सिनेमा नेटफ्लिक्सवर सहज पाहू शकता.
मिराज
Mirage on OTT: २०१८ मध्ये रिलीज झालेला हा एक मिस्ट्री ड्रामा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन ओरिओल पाउलो यांनी केले होते. या चित्रपटात चिनो ड्रोन, अल्वारो मोर्टे यांच्यासह अनेक स्टार्स होते. या चित्रपटात पाहायला मिळतं की एक पती-पत्नी नवीन घरात शिफ्ट होतात, त्यांना तिथे जुना टीव्ही आढळतो. पण त्या टीव्हीच्या पलीकडे असलेला मुलगा त्यांच्याशी बोलतो. पुढे काय होते ते खूप मनोरंजक आहे. तुम्ही हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
द अॅडम प्रोजेक्ट
The Adam Project on OTT: २०२२ मध्ये रिलीज झालेला हा एक सायन्स-फिक्शन ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. यात वॉकर स्कोबेल, एडिसन ट्यूनिंगसह अनेक स्टार्स झळकणार आहेत. या सिनेमात पाहायला मिळतं की कसा एक जण टाइम ट्रॅव्हलमध्ये जातो आणि चुकून २०२२ सालात अडकतो. यात तो भविष्य बदलू इच्छितो, पण त्याच्याबरोबर भलतंच घडतं. हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
प्रेडेस्टिनशन
Predestination on OTT : २०१४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट देखील टाइम ट्रॅव्हलवर आधारित आहे. यामध्ये टाइम ट्रॅव्हल करून एकाव्यक्तीला बॉम्ब हल्ला रोखण्याचे काम कसे सोपवले जाते ते पाहायला मिळतं. यात नंतर जे घडतं ते अतिशय भयंकर आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.