२०२४ मध्ये पूर्ण वर्षभर प्रेक्षकांना विविध वेब सीरिजची मेजवानी ओटीटीवर उपलब्ध झाली. वर्षभर ओटीटी माधम्यांवर अनेक भारतीय वेब सीरिज आल्या. यातील काही वेब सीरिज प्रचंड गाजल्या. थ्रिलर, कॉमेडी, सायकॉलॉजिकल थ्रिलर, हॉरर तसेच कॉमेडी अशा विविध आशयाच्या सीरिजचा प्रेक्षकांनी आस्वाद घेतला. आता याच गाजलेल्या वेब सीरिजमधून २०२४ मधील सर्वोत्तम आणि गाजलेल्या १० वेब सीरिजची यादी आली आहे.

२०२४ मधील सर्वोत्तम वेब सीरिज बघून तुम्ही या वर्षाला निरोप देऊ शकता. IMDB या चित्रपट, वेब सीरिजची माहिती सांगण्याऱ्या पोर्टलने २०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी प्रदर्शित केली आहे. या यादीत विविध आशय असलेल्या उत्तम भारतीय वेब सीरिज असून या मालिका तुम्हाला कुठे बघता येतील ही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

OTT Release in January First Week
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात OTT वर काय पाहायचं? वाचा दमदार कलाकृतींची यादी!
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
The Sabarmati Report OTT Release on Zee5 on January 10, 2025
The Sabarmati Report OTT Release: आता विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट ओटीटीवर पाहता येणार; कुठे, कधीपासून जाणून घ्या…
All We Imagine As Light OTT release
जगभर गाजलेला All We Imagine As Light ओटीटीवर रिलीज होणार; कधी, कुठे पाहता येणार सिनेमा? वाचा
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Gashmeer Mahajani calls Bigg Boss 18 third class
“काय ते थर्ड क्लास…”, गश्मीर महाजनीचं Bigg Boss 18 बद्दल प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर; म्हणाला, “अहो तुम्ही मराठी सिनेमा…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा…जगभर गाजलेला All We Imagine As Light ओटीटीवर रिलीज होणार; कधी, कुठे पाहता येणार सिनेमा? वाचा

हीरामंडी

Heeramandi On Netflix : या यादीत पहिल्या क्रमांकावर संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी’ ही वेब सीरिज आहे. संजय लीला भन्साळी यांनी या वेब सीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केले. ही त्यांनी दिग्दर्शित केलेली पहिली वेब सीरिज असून यात मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सीरिज खूप गाजली होती, तुम्हाला ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

मिर्झापूर सीझन ३

Mirzapur Season 3 On Prime Video : ‘मिर्झापूर सीझन ३’ ही २०२४ मधील बहुचर्चित वेब सीरिज होती.या सीरिजमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल यांसह अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. ‘मिर्झापूर ३’ला या सीरिजच्या पहिल्या दोन भागांप्रमाणे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ही सीरिज तुम्हाला प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.

हेही वाचा…Video : छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना आणि १७ व्या शतकातील रहस्य, ‘द सिक्रेट ऑफ शिलेदार’चा टीझर झाला प्रदर्शित; कुठे बघता येईल सीरिज?

पंचायत सीझन ३

Panchayat Season 3 on Prime Video :  द व्हायरल फीव्हरची ‘पंचायत सीझन ३’ ही वेब सीरिज आयएमडीबीच्या २०२४ मधील गाजलेल्या सीरिजच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘द व्हायरल फिव्हर’ म्हणजे ‘टीव्हीएफने निर्मिती केलेली या सीरिजलाही पंचायतच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागांप्रमाणे प्रेक्षकांची पसंती मिळाली. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव या कलाकारांनी यात मुख्य भूमिका साकारली आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ९ रेटींग मिळाली आहे. ही सीरिज तुम्हाला प्राईम व्हिडीओ वर पाहता येईल.

ग्यारह ग्यारह

Gyarah Gyarah On Ott : ‘ग्यारह ग्यारह’ ही एक क्राईम थ्रिलर वेब सीरिज आहे.या सीरिजमध्ये राघव जुयाल, क्रितीका कामरा आणि धैर्य करवा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली असून या सीरिजला आयएमडीबीवर ८.२ रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज तुम्हाला झी ५ वर बघता येईल.

सिटाडेल : हनी बनी

Citadel Honey Bunny On Ott : वरूण धवन आणि समांथा रुथप्रभू यांची मुख्य भूमिका असलेली सिटाडेल हनी बनी ही स्पाय थ्रिलर सीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये गुप्तचरांच्या (स्पाय एजेंटच्या) जीवनातील अनेक प्रसंग, मिशन्स आणि जबरदस्त ॲक्शन दाखवण्यात आली आहे. यात वरूण धवन आणि समांथाची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. फॅमिली मॅन सीरिजचे दिग्दर्शक राज आणि डिके यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले असून ही सीरिज प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

हेही वाचा…सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा

मामला लीगल है

Mamla Legal Hai On Ott :भोजपुरी स्टार रवी किशन यांची ‘मामला लीगल है’ ही कोर्टरूम कॉमेडी ड्रामा वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये रवी किशन यांच्यासह नायला गरेवाल, निधी बिश्त, अनंत जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजला आयएमडीबीवर ८ रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

ताजा खबर २

Taza Khabar 2 On Ott : भुवन बामची मुख्य भूमिका असलेल्या ‘ताजा खबर’ या वेब सीरिजचा पहिला सीझन खूप गाजला होता आणि या शोचा दुसरा सीझनलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या सीरिजमध्ये भुवन बामसह, श्रिया पिळगांवकर, प्रथमेश परब हे मराठी कलाकार आहेत. ही सीरिज तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा शो पाहू शकता.

हेही वाचा…Video: लोकलने प्रवास करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? सीरिज नेटफ्लिक्सवर आहे ट्रेंडिंग

मर्डर इन माहिम

Murder In Mahim On Ott :आशुतोष राणा व विजय राज क्राइम थ्रिलर सीरिज ‘मर्डर इन माहिम’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या मर्डर मिस्ट्री सीरिजमध्ये शिवानी रघुवंशी व शिवाजी साटमदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सीरिजला आयएमडीबीवर ७.५ रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज तुम्हाला जिओ सिनेमावर पाहता येईल.

शेखर होम

Shekhar Home On Ott : ‘शेखर होम’ स्पाय ड्रामा सीरीज आहे ज्यामध्ये केके मेनन यांनी एका खासगी गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. हा गुप्तहेर महान शेरलॉक होम्सपासून प्रेरित आहे. या सीरीजमध्ये रणवीर शौरी कीर्ती कुल्हारी, रसिका दुग्गल प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. ही सीरीज जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.

हेही वाचा…Amazon Prime वापरता? २०२५ पासून लागू होणार नवे नियम जाणून घ्या, पासवर्ड शेअरिंग अन्…

द ग्रेट इंडियन कपिल शो

The Great Indian Kapil Show On OTT : द ग्रेट इंडियन कपिल शो हा कॉमेडी कार्यक्रम दर शनिवारी रात्री ८ वाजता नेटफ्लिस वर लागतो. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी येतात. कपिल शर्मा, कृष्णा यांच्या कॉमेडीने या शोने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली आहे.

Story img Loader