आजकाल प्रेक्षकांमध्ये भयावह चित्रपट पाहण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या क्रेझचा फायदा घेण्यासाठी अनेक निर्माता-दिग्दर्शक विविध भयपटांची निर्मिती करीत आहेत. या वर्षीच्या सुरुवातीला ‘शैतान’ या सुपरनॅचरल चित्रपटाने सर्वांत पहिल्यांदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर ‘मुंज्या’, ‘स्त्री २’, ‘काकुडा’ अशा अनेक हॉरर चित्रपटांनीदेखील प्रेक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. मात्र, आता आम्ही तुम्हाला पाच अशा चित्रपटांची माहिती देणार आहोत; ज्यामुळे तुम्ही कदाचित भीतीनं जागेवरून हलणारदेखील नाही. विशेष म्हणजे हे चित्रपट तुम्ही ओटीटीवर फ्रीमध्ये पाहू शकता.

राजू गारी गाधी ३ (Raju Gari Gadhi 3)

२०१९ साली रिलीज झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमकार यांनी केलं आहे. टीव्हीवर प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अविका गौर आणि अश्विन बाबू या चित्रपटात मुख्य भूमिकांत आहेत. चित्रपटाची कथा त्यांच्याभोवती फिरते. चित्रपटात दाखवलं आहे की, जो कोणी माया (अविका गौर) ला प्रपोज करतो आणि तिला सोडून जातो, त्याला एक आत्मा ठार मारते. या चित्रपटात अनेक भयावह दृश्यं आहेत; जी पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील. हा चित्रपट यूट्यूबवर हिंदीत फ्रीमध्ये पाहता येईल.

darlings badla merry christmas ott thriller movies
सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहायला आवडतात? मग नक्की पाहा नेटफ्लिक्सवरील हे सिनेमे
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी
Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
November OTT Release List
नोव्हेंबर महिन्यात OTT वर येणार जबरदस्त चित्रपट अन् सीरिज; वाचा कलाकृतींची यादी
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Mindhunter Dark Narcos Aranyak webseries netflix
या वीकेंडला OTT वर अनुभवा थरार, पाहा नेटफ्लिक्सवरील ‘या’ पाच थ्रिलर वेब सीरिज
action humor and thriller webseries
या आठवड्यात OTT वर बघा हटके कथांसह जबरदस्त अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि थ्रिलर कंटेन्ट, वाचा यादी

हेही वाचा…ओटीटीवरच्या ‘या’ Turkish सीरिज करतील तुमचं भरभरून मनोरंजन, पाहा यादी

तंतीराम (Tantiram)

या यादीत दुसरं नाव ‘तंतीराम’चं आहे. हा एक हॉरर मिस्ट्री चित्रपट आहे; ज्यात प्रियांका शर्मा आणि इतर अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा बालचंद्रन या तरुणाभोवती फिरते, जो महिलांशी बोलणं टाळतो आणि तो त्याच्या वाईट भूतकाळामुळे त्याच्या आईबरोबर एकटं राहणं पसंत करतो. मात्र, गोष्टी तेव्हा बदलतात, जेव्हा त्याचं लग्न अलागिनी नावाच्या एका सुंदर मुलीशी होतं, जी त्याला आनंदी आणि प्रेमळ बनवते; पण अचानकच त्याच्यावर जिन्नाचं आक्रमण होतं आणि सगळं काही बदलून जातं.

बेदुआ (Beddua : The Curse)

२०१८ साली रिलीज झालेला हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटातील एक भयावह दृश्य प्रेक्षकांना खूप प्रभावित करतं. हा चित्रपटदेखील यूट्यूबवर मोफत उपलब्ध आहे.

हेही वाचा…Video: ‘मानवत मर्डर’ माझी पहिली केस’ शरद पवारांनी उलगडला १९७२ चा थरार; पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णींबद्दल म्हणाले…

भूतकालम (Bhoothakaalam)

‘भूतकालम’ हा चित्रपट आशा (रेवती) आणि तिचा मुलगा विनू (निगम) यांच्या जीवनावर आधारित आहे. या दोघांच्या आयुष्यात अचानक एक विचित्र घटना घडते; जेव्हा विनूला वाटतं की त्यांच्या घरात काही अलौकिक शक्ती आहे. या चित्रपटाची कथा तुम्हाला पूर्णतः गुंतवून ठेवते. हा चित्रपटदेखील यूट्यूबवर फ्रीमध्ये पाहता येतो.

हेही वाचा…जेव्हा माणूस घेतो आत्म्याकडून बदला, हिंमत असेल तरच पाहा OTT वरील हा चित्रपट

कंचना (Kanchana)

दक्षिणेच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘कंचना’च्या अनेक भागांनी प्रेक्षकांना घाबरवलं आहे. या चित्रपटातील कथा आणि दृश्यं इतकी भयानक आहेत की, कोणीही हा चित्रपट एकटा पाहू शकत नाही. हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे.

Story img Loader