बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली. तसेच काही महिन्यापूर्वी आर्या या वेबसीरिजद्वारे तिने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक केलं. त्यानंत आता लवकरच सुश्मिता ‘ताली’ या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव करत आहे. ट्रान्सजेंडर एक्टिविस्ट गौरी सावंतच्या बायोग्राफीवर ही वेबसीरिज आधारित आहे. यात सुश्मिता सेन ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर आगमी वेब सीरिज ‘ताली’चा लूक शेअर केला होता. या पोस्टरमध्ये तिचा लूक फारच छान दिसत आहे. या वेबसीरिजद्वारे सुष्मिता सेन पहिल्यांदा ट्रांन्सजेंडरची भूमिका साकारत आहे. ‘ताली’ या वेबसीरिजचा पोस्टर प्रदर्शित होताच नुकतंच गौरी सावंतने याबद्दल प्रतिक्रिया दिली.
आणखी वाचा : “आर्थिक मंदीदरम्यान…” ‘इंडियन आयडल’ जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांबद्दल अभिजीत सावंतने केला खुलासा

याबद्दल आजतकशी बोलताना गौरी सावंत म्हणाली, “एक विश्वसुंदरी हिजऱ्याची भूमिका साकारणार आहे, हे पाहून फारच आनंद वाटला. तृतीयपंथी समाजासाठी ही फारच आनंदाची गोष्ट आहे. सुश्मिता सेन ही या भूमिकेला योग्य तो न्याय देईल, असे मला वाटतं. जर कोणी मोठ्या अभिनेत्याने यात भूमिका साकारली असती तर ते फार हास्यास्पद वाटले असते. पण सुश्मिता सेन ही ही भूमिका योग्यरित्या साकारेल.”

आणखी वाचा : “मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“एखाद्या तृतीयपंथीय व्यक्तीच्या आयुष्यावर बायोपिक तयार होणं ही गोष्ट फार मोठी आहे. त्यातही अभिनेत्री सुष्मिता सेन माझी भूमिका करत आहे, हे पाहिल्यानंतर मला फारच कौतुक वाटले. यामुळे मला फारच हायसे वाटत आहे. ताली या बायोपिकमध्ये माझी भूमिका कोण साकारणार याबद्दल मला कोणतीही कल्पना नव्हती. एखादा दाक्षिणात्य अभिनेता किंवा अभिनेत्री माझी भूमिका साकारेल असे त्यावेळी वाटलं होतं. माझी अंगकाठी ही फार मुलांसारखी आहे.”

“पण जेव्हा मला सुश्मिता सेन हे नाव सांगण्यात आलं तेव्हा मी फार हसले होते. मी रात्रभर हसत होते. मला सुश्मिताचे चुनरी चुनरी हे गाणे डोळ्यासमोर येत होते. तीच सुश्मिता माझी भूमिका साकारणार याबद्दल मला विश्वासच बसत नव्हता. पण जेव्हा तिने याच्या करारावर स्वाक्षरी केली त्यावेळी मला विश्वास बसला”, असेही गौरी सावंतने सांगितले.
आणखी वाचा : सुश्मिता सेन झळकणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत, मराठमोळ्या दिग्दर्शकाबरोबर करणार काम

दरम्यान या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या खांद्यावर असणार आहे. ही वेब सीरिज वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. या वेबसीरिजचे एकूण ६ एपिसोड असणार आहेत. त्याद्वारे गौरी सावंतच्या आयुष्यातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर मांडले जाणार आहेत. या वेबसीरिजची निर्मिती अर्जुन सिंग बारान आणि कार्तिक डी निशंदर करत आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transgender gauri sawant first reaction on shusmita send taali poster relese nrp