तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ‘ताली’वेब सीरिजची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. जिओ सिनेमावर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘ताली’मध्ये अभिनेत्री सुश्मिता सेनने गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. ‘ताली’ सीरिजच्या निमित्ताने गौरी सावंत यांनी नुकतीच एबीपी माझाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांचा जीवनप्रवास, सामाजिक लढा, तृतीयपंथीयांचं आयुष्य याविषयी सांगितलं.
हेही वाचा : “‘जवान’ला ठरवून डोक्यावर घेतलं”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “भ्रष्ट नेत्यांकडून…”
गौरी सावंत या गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथी समाजासाठी काम करत आहेत. आयुष्यात बरीच संकटं आणि दुःखांचा सामना त्यांना करावा लागला आहे. त्या सांगतात, “साडी कशी नेसायची, कसं बसायचं या गोष्टी मला माझ्या गुरुंनी शिकवल्या. एका काळानंतर आम्हाला दाढी यायला लागते आणि दाढी करायला आमच्याकडे एक चिमटा असतो. त्या चिमट्याने एक-एक केस आम्ही ओढून काढतो.”
हेही वाचा : “मला अजून २-३ मुलं चालतील पण…”, जिनिलीया गरोदर असल्याच्या अफवांवर रितेश देशमुखने दिलं स्पष्टीकरण
गौरी सावंत पुढे सांगतात, “हे बाईपण एवढं सोप नाहीये… पुरुषांचे हार्मोन्स शरीरात असल्याने दाढी येणं स्वाभाविक असतं. अशावेळी गुरु आईच्या मांडीवर डोकं ठेऊन त्यांनी मला दाढी कशी करायची हे शिकवलं. २ रुपयांच्या ब्लेडने दाढी केलीस, तर उद्या संध्याकाळपर्यंत पुन्हा दाढी येणार…त्यापेक्षा अशी मूळापासून दाढी करायची जेणेकरून १५ दिवसांनी येईल. या सगळ्या गोष्टी आम्हाला गुरुंकडून शिकवल्या जातात.”
हेही वाचा : Video: सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज, गाडीची खास झलक दाखवत म्हणाले…
“माणूस हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी कळपातच राहणार… आमचे गुरु सुरुवातीला आम्हाला घर देतात. घरात छोटंस देवघर असतं. गुरु खाटेवर झोपतात इतर गुरुभाऊ खाली, प्रत्येकाने भिक मागून आणलेल्या पैशांची वाटणी केली जाते. रोजच्या जेवणाचे पैसे गुरुला देऊन बाकीचे पैसे भविष्यासाठी साठवायचे असतात. त्यामुळे सुरुवातीला प्रत्येकाला गुरुची गरज असतेच.” असं गौरी सावंत यांनी सांगितलं.