तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ‘ताली’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. जिओ सिनेमावर आज ही वेब सीरिज प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सुश्मिता सेन हिनं गौरी सावंत यांची भूमिका निभावली आहे. तर सीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव आणि लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केलं आहे. दरम्यान, आपल्याच जीवनावर आधारित असलेली सीरिज पाहिल्यानंतर गौरी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’नंतर सुकन्या मोने दिसणार ‘या’ चित्रपटात; शूटिंगला सुरुवात

गौरी यांनी सोशल मीडियावर सुश्मिता सेनबरोबरचा फोटो शेअर करून लिहिलं आहे की, “आपलीच ‘टाळी’ जेव्हा जोरात वाजते, तेव्हा कधी कधी आपणच दचकतो, जसं आपली जीभ आपल्या दाताखाली येते तेव्हा. आज बायोपिक बघताना हेच होतं माझ्या मनात, ठिबक सिंचन डोळ्यातून चालूच होतं. तृतीयपंथीयांच्या पालकांना काय वाटत असेल….. होणारी घुसमट, त्रास याला सुश्मितानं न्याय दिला आहे… क्षितिज काय लिहिलंय रे बाबा… रवी जाधव यांनी खूप छान दिग्दर्शन केलं आहे. माझ्या संपूर्ण समाजाकडून मी तुमचे आभार मानते…सरळ सोप्या पद्धतीनं माझं आयुष्य दाखवल्याबद्दल… अफिफा नडियादवाला हिनं मला नव्यानं जगासमोर आणलं.. कार्तिक आणि अर्जुन यांचेही आभार…”

हेही वाचा – ‘लोकमान्य’ फेम अभिनेत्री आता ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत पिंकीच्या भूमिकेत दिसणार

हेही वाचा – कधीही न पाहिलेल्या भूमिकेत झळकणार भरत जाधव; ‘हे’ नवे नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गौरी सावंत यांच्या या पोस्टवर सीरिजचे दिग्दर्शक आणि लेखकानं प्रतिक्रिया दिली आहे. रवी जाधव म्हणाले की, “ज्यांच्या आयुष्यावर आपण सीरिज तयार करतो, त्यांच्याकडून कौतुक होण्यासारखा दुसरा आनंद नाही. धन्यवाद गौरी सावंत आमच्यासाठी हे सर्वात मोठं कौतुक आहे.” तर लेखक क्षितीज पटवर्धन म्हणाले की, “आमच्यासाठी सगळ्यात मोठी पावती ही आहे गौरी.”

हेही वाचा – “दीड वर्षापूर्वीच्या ‘त्या’ दिवशी…”; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, “काट लो जुबान…”

दरम्यान, ‘ताली’ या सीरिजमध्ये बऱ्याच मराठी कलाकारांनी काम केलं आहे. अभिनेत्री हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, कृतिका देव, अभिनेता सुव्रत जोशी, नंदु माधव या सीरिजमध्ये पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transgender social worker gauri sawant first reaction on taali web series pps
Show comments