आज प्रत्येक कलाकार ओटीटी माध्यमावर काम करताना दिसून येत आहे. टिव्ही कलाकार, बॉलिवूडमधील अभिनेतेदेखील हळूहळू आता ओटीटी माध्यमाकडे वळत आहेत. आज ओटीटी विश्वात नवनवे विषय हाताळले जात आहेत. प्रसिद्ध होस्ट, अभिनेता मनीष पॉल आता ओटीटी माध्यमावर दिसणार आहे. नुकतेच त्याने एका वेबसीरिजचे चित्रीकरण संपवले आहे. याबाबत त्याने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली.

दिग्दर्शक रितंम श्रीवास्तव दिग्दर्शित या वेबसीरिजचे दिग्दर्शन करत आहेत. यात अभिनेता मनीष पॉल पहिल्यांदा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज सस्पेन्स थ्रिलर असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार जूनच्या मध्यात मनीषने चित्रीकरण सुरू केले होते त्याच दरम्यान तो ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मनीष पूर्णवेळ या वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त होता. डेहराडून येथे पाहिले चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर दिल्ली,जयपूर, वसई, नायगाव, मुंबई या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले आहे. मनीषची नवी वेबसीरिजचे पोस्ट प्रॉडक्शन सुरु झाले आहे. पुढचा वर्षी ही प्रदर्शित होणार आहे.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
A viral video of a young woman selling pani puri
“१५ -२० सेकंदांची रील आमचे कष्ट दाखवत नाही” पाणी पुरी विकणाऱ्या तरुणीने मांडली व्यथा, VIDEO होतोय व्हायरल
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
yek number actor vishal sudarshanwar plays raj thackeray role
“तेव्हा समोर स्वत: राजसाहेब बसले होते…”, ‘येक नंबर’मध्ये मनसे अध्यक्षांची भूमिका कोणी साकारलीये? अभिनेता म्हणाला…

मनीषने पुन्हा एकदा टीव्हीवर दिसणार आहे. डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा १०’ होस्ट करण्यासाठी सज्ज आहे. या शोमध्ये तो पाच वर्षांनी पुनरागमन करणार आहे. दरम्यान तो एका मुलाखतीत असं म्हणाला की ‘असं वाटतं की एक दरवाजा बंद झाला की दुसरा तुमच्यासाठी उघडतो. ‘झलक’ नंतर करण सरांनी मला ”जुग जुग जियो’ चित्रपटासाठी विचारले आणि ते माझ्यासाठी खरोखरच फायद्याचे ठरले. होस्टींगवरून तो म्हणाला हे खरोखर खूप आव्हानात्मक आहे. बर्‍याच लोकांना वाटते की हे खूप सोपे आहे परंतु सत्य त्यापेक्षा बरेच वेगळे आहे’.