आज ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी आपल्यासमोर बरेच पर्याय उपलब्ध आहेत, पण या ओटीटी विश्वाची ओळख सर्वप्रथम कुणी करून दिली असेल तर ती ‘टीव्हीएफ’ (द व्हायरल फिव्हर) या युट्यूब चॅनेलने. काही व्हायरल व्हिडिओजच्या जोरावर आज टीव्हीएफने स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित केलं आहे. पहिले काही व्हिडिओज आणि मग हळूहळू वेबसीरिजमध्ये हातपाय मारू पाहणाऱ्या ‘टीव्हीएफ’च्या बहुचर्चित ‘पिचर्स’ या वेबसीरिजचा दूसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे, आणि नेहमीप्रमाणे टीव्हीएफने पुन्हा हे सिद्ध केलं आहे की भारतात तरी ओटीटी आणि कंटेंटच्या बाबतीत त्यांच्याशी स्पर्धा करणारं कुणीच नाही. यामागील एकमेव कारण म्हणजे त्यांनी केलेली कथांची निवड, हाताळणी आणि सादरीकरण.

भारतात एखादी वेबसीरिज प्रचंड लोकप्रिय झाली की तिच्या पुढच्या सीझनवर त्याचा दबाव येतो. ‘पिचर्स’ ही अशी एकमेव भारतीय वेबसीरिज आहे जिच्यावर हा दबाव असूनसुद्धा त्याच्या दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांवरची पकड अजिबात सोडलेली नाही. तब्बल ७ वर्षांनी या वेबसीरिजचा हा दूसरा सीझन आला आहे तरी ही सीरिज कुठेही प्रेक्षकांपासून दूर गेल्यासारखी वाटणार नाही, आणि हीच या सीरिजची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल

‘पिचर्स’चा पहिल्या सीझनमध्ये कॉलेजच्या मित्रांच्या ग्रुपपासून एक कंपनी तयार करण्याच्या स्वप्नापर्यंतचा प्रवास उलगडतो. या पहिल्या सीझनमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला खूप भारी वाटतात, हा सीझन आपल्या मनात कॉर्पोरेट कल्चर आणि स्टार्टअपचं विश्व याबद्दल एक वेगळंच कुतूहल निर्माण करतो. पण जेव्हा ७ वर्षांनी ही गोष्ट पुढे जाते तेव्हा काळानुरूप तिच्यात बरेच बदल झालेले आपल्याला आढळतात. प्रत्येक पात्रामध्ये एकप्रकारचा संयम तुम्हाला पाहायला मिळतो आणि इथेच हा दूसरा सीझन बाजी मारतो. पहिल्या सीझनमध्ये ‘प्रगती’ या कंपनीची सुरुवात इथवरच आपण गोष्ट पाहिलेली असते, दुसऱ्या सीझनमध्ये ४ वर्षांनंतर ४ मित्रांनी सुरू केलेल्या कंपनीत तब्बल २४ लोक काम करत असतात. आजूबाजूचं वातावरण, मार्केट, स्पर्धा सगळंच बदललेलं आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक पात्राची मानसिकता आणि उद्योजक म्हणून मार्केटकडे बघायचा दृष्टिकोनही बदललेला आहे. पहिल्या सीझनमध्ये स्टार्टअप विश्वाचं फेअरीटेलसारखं चित्रण केल्यानंतर हा दूसरा सीझन या विश्वाची अगदी उलट बाजू आपल्यासमोर मांडतो जे सध्याचं वास्तव आहे.

आणखी वाचा : “एक वर्षं खराब गेलं…” बॉलिवूडची बाजू घेत रोहित शेट्टीने दिलेलं उत्तर ऐकून लोकांनी वाजवल्या टाळ्या, शिट्ट्या

‘पिचर्स’चा हा दूसरा सीझन याच गोष्टींवर लक्षकेंद्रित करतो. ‘प्रगती’च्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे आणि या अडथळ्यातून टक्केटोणपे खात अधिक प्रगल्भ होणारे या कंपनीचे फाऊंडर्स हा प्रवास या दुसऱ्या सीझनमधून अत्यंत उत्कृष्टरित्या मांडला आहे. स्टार्टअप विश्वातील स्पर्धा, मोठमोठ्या उद्योगपतीचा याकडे बघायचा दृष्टिकोन, सध्याच्या पिढीमध्ये या स्टार्टअप विश्वाभोवती निर्माण होणारं कुतूहल आणि संभ्रम, यातले खाचखळगे, यामुळे माणसांच्या नात्यांमध्ये निर्माण होणारा गैरसमज आणि दुरावा, अशा कित्येक गोष्टी या दुसऱ्या सीझनमध्ये अत्यंत बारकाईने पेरल्या आहेत. एलॉन मस्कपासून जावेद करीमपर्यंत अशा अत्यंत यशस्वी उद्योजकांच्या मोटीवेशनल कोटपासून सुरू होणारे या सीझन पाचही भाग तुम्हाला तुमच्या आयुष्यातले बरेच महत्त्वाचे धडे देऊन जातात. पिचर्सचा हा दूसरा सीझन स्टार्टअप विश्वात वापरल्या जाणाऱ्या ‘डेथ व्हॅली’ या संकल्पनेवर कटाक्ष टाकतो, पण त्यातून पुन्हा नवी उमेद घेऊन उभं कसं राहायचं हेसुद्धा शिकवतो.

टीव्हीएफच्या इतर वेबसीरिजप्रमाणेच ‘पिचर्स’च्या या सीझनचा खरा हीरो आहे ते म्हणजे याचं लिखाण. अरुणभ कुमार आणि इतर काही लेखकांनी ज्यापद्धतीने याचं लिखाण आणि हाताळणी केली आहे ते पाहता एवढं प्रगल्भ लिखाण बॉलिवूडमध्येसुद्धा व्हायला हवं असं न राहून वाटतं. प्रत्येक भाग आणि त्यातले कित्येक संवाद अक्षरशः तुम्हाला जीवनाकडे बघायचा एक वेगळा दृष्टिकोन देतात. सीरिजमध्ये एक डायलॉग आहे ज्यामध्ये या साऱ्या सीझनचं सार दडलंय, तो म्हणजे “शरीरातील एखादा भाग तुटला तर त्यावर इलाज आहे, पण जेंव्हा माणूस हिंमत सोडतो तेव्हा मात्र त्याला कुणीच त्यातून बाहेर काढू शकत नाही.” या संवादांबरोबरच वेबसीरिजची सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंगसुद्धा उत्तम जमून आलं आहे. एक एक तासाचे ५ भाग कुठेही खेचल्यासारखे वाटत नाहीत.

वेबसीरिजचा शेवट थोडा गुंडाळल्यासारखा वाटतो, म्हणजे त्यात आणखी एक एपिसोड वाढवून या कथेमागचं गांभीर्य आणखी उत्तमरीत्या दाखवता आलं असतं, शिवाय जितेंद्र कुमारच्या पात्राची कमतरता प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते. ते पात्र नेमकं यात का नाही यावर अजूनतरी उत्तर मिळालं नसलं तरी याचा संबंध पुढच्या सीझनशी लावला जाईल अशी आशा आपण व्यक्त करू शकतो. बाकी अभिनयाच्या बाबतीत सगळ्यांनी अप्रतिम काम केलं आहे. आशीष विद्यार्थी, सिकंदर खेर, रिद्धी डोगरा, अभिषेक बॅनर्जी यांची कामं लाजवाब झाली आहेत. मराठमोळा मदन देवधरसुद्धा छोट्याश्या भूमिकेत त्याची चुणूक दाखवतो. अरुणभ कुमारचा अभिनय तसाही मर्यादित असल्याने त्याला जेवढं काम होतं ते त्याने चांगलंच केलं आहे. नवीन कस्तुरिया आणि अभय महाजन या दोघांनी मात्र या सगळ्यांवर कुरघोडी केली आहे. खासकरून नवीनचा त्याच्या आईचं पात्र साकारणाऱ्या नीना कुलकर्णी यांच्याबरोबर फोनवरील संभाषणाचा एक सीन आहे तो खरंच तुमच्या काळजाला हात घालतो. अभय महाजनचं मंडल हे पात्र पाहिल्या सीझनमध्ये जितकं साधं दाखवलं आहे त्यापेक्षा कईक पटीने ते या दुसऱ्या सीझनमध्ये मॅच्युअर दाखवलं आहे आणि अभयने ते पात्र उत्तमरीत्या सादर केलं आहे. बाकी इतरही कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे.

एकूणच ‘पिचर्स’चा हा दूसरा सीझन स्टार्टअप विश्वाची एक वेगळी बाजू मांडून त्याबद्दलचे तरुणांच्या मनात असलेले गैरसमज दूर करायचा प्रयत्न करतो. ‘स्पायडर मॅन’ या चित्रपटातील एक लोकप्रिय संवाद आहे, “With great power comes great responsibility.” पिचर्सच्या दुसऱ्या सीझनमधल्या या ३ पिचर्सचा हा प्रवास बघताना आपल्यासमोर चटकन हाच संवाद येतो. पिचर्स आणि टीव्हीएफच्या चाहत्यांनी ही सीरिज पहावीच शिवाय इतरांनीही याचे दोन्ही सीझन आवर्जून बघायलाच हवेत.