Underrated Thriller Movies on OTT : भारतात अनेक थ्रिलर चित्रपट बनतात, यापैकी काही चित्रपट खूप गाजतात, मात्र काहींच्या कथा चांगल्या असूनही त्यांना तेवढी लोकप्रियता मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटांमध्ये इतके ट्विस्ट आहेत की तुमचं डोकं चक्रावेल. तुम्हाला सिनेमा पाहताना वाटणारच नाही की त्यात असा ट्विस्ट येऊ शकतो. तुम्ही जर ‘अंधाधुन’ आणि ‘कहानी’ सारख्या चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्हाला हे थ्रिलर चित्रपट खूप आवडतील. या चित्रपटांची नावं व ते कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, याबद्दल जाणून घेऊयात.

रात अकेली हैं

Raat Akeli Hai on OTT: हनी त्रेहान दिग्दर्शित ‘रात अकेली है’ हा चित्रपट २०२० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, श्वेता त्रिपाठी, तिग्मांशु धुलिया, इला अरुण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका छोट्या शहरातील पोलीस कर्मचाऱ्याची ही कथा आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये एक ट्विस्ट येतो, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.२ रेटिंग मिळाले आहे.

Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
thangalaan buchingham murders agent ott release novembar
थिएटरमध्ये रिलीज झाले, पण ओटीटीवर रखडलं प्रदर्शन; अखेर घरबसल्या पाहता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट
suspense thriller movies on ott
OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ थरारक सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, चित्रपटांच्या रहस्यमय कथा ठेवतील खिळवून; पाहा यादी
Indias most expensive film flopped after row over same sex kiss
दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा – ‘सिंघम अगेन’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या

मोनिका ओ माय डार्लिंग

Monica, O My Darling on OTT: ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ या सिनेमात इतके ट्विस्ट आहेत की तुम्ही चक्रावून जाल. वासन बाला दिग्दर्शित हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. हा एक डार्क कॉमेडी क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. यात राजकुमार राव, हुमा कुरेशी आणि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. त्याला आयएमडीबीवर ७.४ रेटिंग मिळाले आहे.

हेही वाचा – ‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी

दृश्यम 2

Drishyam 2 on OTT: मल्याळम चित्रपट ‘दृश्यम’ हा खूप गाजला होता. या सुपरहिट चित्रपटाचा नंतर सीक्वेलदेखील आला, तोही पहिल्या भागाप्रमाणेच हिट झाला. दृश्यम २ ची कथा जीतू जोसेफ यांनी लिहिली आहे, त्यांनीच चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटात मोहनलाल, मीना, अन्सिबा हसन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. चित्रपटाला आयएमडीबीवर ८.४ रेटिंग मिळाले आहे.

५३व्या मजल्यावरील आलिशान घरात राहते माधुरी दीक्षित, पाहा तिच्या मुंबईतील घरातील Inside Photos

सी यू सून

See You Soon on OTT: मल्याळम चित्रपट ‘सी यू सून’ हा एक उत्तम थ्रिलर चित्रपट आहे. या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी अन् दिग्दर्शन कमाल आहे. तुम्ही हा चित्रपट संपेपर्यंत जागेवर हटणार नाही. हा चित्रपट २०२० मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचा क्लायमेक्स तुम्हाला हादरवून टाकेल. या चित्रपटाची कथा महेश नारायणन यांनी लिहिली असून चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.६ रेटिंग मिळाले आहे.

जॉनी गद्दार

Johnny Gaddaar on OTT:तुम्ही श्रीराम राघवनचा थ्रिलर चित्रपट ‘जॉनी गद्दार’ अजून पाहिला नसेल, तर नक्की पाहा. या चित्रपटात नील नितीन मुकेश, धर्मेंद्र आणि विनय पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.९ रेटिंग मिळाले आहे.

हेही वाचा – नोव्हेंबर महिन्यात OTT वर येणार जबरदस्त चित्रपट अन् सीरिज; वाचा कलाकृतींची यादी

कप्पेला

Kappela on OTT: कप्पेला हा एक उत्कृष्ट मल्याळम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुहम्मद मुस्तफाने केले असून चित्रपटाची कथाही त्यानेच लिहिली आहे. या चित्रपटात एका मुलीला राँग नंबरवरून कॉल येतो आणि ती मुलगी फोनवरच त्या मुलाच्या प्रेमात पडते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. याला आयएमडीबीवर ७.५ रेटिंग मिळाले आहे.