सोशल मीडियावर नेहमीच फॅशनचे नवे ट्रेंड्स उलगडत राहणारी उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. उर्फीच्या एका पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. उर्फीने केलेल्या बोटॉक्स आणि फिलवरून तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलंय. पण, उर्फीला काही अशा अ‍ॅलर्जीज आहेत, ज्या दर दोन दिवसांनी तिच्या चेहर्‍यावर होतात. याबाबत आता उर्फीने खुलासा केला आहे.

उर्फीने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये उर्फीचा चेहरा सुजलेला दिसतोय. या फोटोला कॅप्शन देत उर्फी म्हणाली, “मला लोकांकडून अशा प्रतिक्रिया मिळतायत की फिलर्समुळे माझा चेहरा जरा जास्तच सुजलाय. मला खूप ॲलर्जी आहे, माझा चेहरा बहुतेक वेळा सुजलेला असतो. मी दर दुसऱ्या दिवशी अशीच उठते आणि माझा चेहरा नेहमी सुजलेला असतो, यामुळे मी नेहमी अस्वस्थ असते. हे फिलर्स नाही आहेत, या अ‍ॅलर्जीज आहेत.”

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Sadhvi Pragya Sing Thakur
Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो; म्हणाल्या, “मी जगले वाचले तर काँग्रेसच्या टॉर्चरविरोधात…”
Robin Uthappa Statement on CSK Angry on Franchise For Allowed New Zealand Rachin Ravindra to Train at Their Academy
Robin Uthappa: “देशहित आधी आणि नंतर फ्रँचायझीचे खेळाडू…”, रॉबिन उथप्पा CSK वर भडकला, रचिन रवींद्रला कसोटीपूर्वी मदत केल्याबद्दल सुनावलं
Aaron Finch Befitting Reply to Sunil Gavaskar on Statement About Rohit Sharma Misses 1st Test Said If Your wife is going to have a baby IND vs AUS
Rohit Sharma: “रोहितला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी थांबायचे असेल…”, हिटमॅनबद्दलच्या वक्तव्यावर आरोन फिंचने गावस्करांना दिले चोख प्रत्युत्तर

उर्फी पुढे म्हणाली, “इम्युनोथेरपी चालू आहेृ, पण जर तुम्ही मला अशा सुजलेल्या चेहऱ्यामध्ये पाहिलंत तर तुम्ही समजून जा की मला अ‍ॅलर्जी झाली आहे. मी माझ्या नेहमीच्या फिलर आणि बोटॉक्सशिवाय काहीही केले नाही, जे मी १८ वर्षांची असल्यापासून करत आहे. जर तुम्हाला माझा चेहरा सुजलेला दिसत असेल तर मी फिलर्स वगैरे नको करायला असे सल्ले देऊ नका, मला फक्त सहानुभूती दाखवा आणि पुढे जा.”

हेही वाचा… “लग्नानंतर कोणी प्रपोज केला आहे का?” ऐश्वर्या नारकर यांनी चाहत्याच्या ‘त्या’ प्रश्नावर दिलं ‘असं’ उत्तर; म्हणाल्या, “सगळ्यांना…”

उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत आणि उर्फीच्या चाहत्यांनी तिला सपोर्ट करण्यासाठी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “मी सोशल मीडियावर पाहिलेली उर्फी ही सर्वात प्रामाणिक व्यक्ती आहे, यात शंका नाही.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “लवकर बरी हो, काळजी घे.”

हेही वाचा… VIDEO: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यातून भारतात कुटुंबासह परतला शाहरुख खान; पापाराझींना पाहून आर्यन खान…

दरम्यान, उर्फी बिग बॉस ओटीटीनंतर चर्चेत आली. उर्फीने याआधी अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. १९ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित झालेला “लव्ह सेक्स और धोका-२” या चित्रपटात उर्फी शेवटची झळकली होती. आता उर्फी तिच्या वेगवेगळ्या फॅशनेबल आउटफिट्समुळे चर्चेत असते.