सोशल मीडियावर नेहमीच फॅशनचे नवे ट्रेंड्स उलगडत राहणारी उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. उर्फीच्या एका पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. उर्फीने केलेल्या बोटॉक्स आणि फिलवरून तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलंय. पण, उर्फीला काही अशा अॅलर्जीज आहेत, ज्या दर दोन दिवसांनी तिच्या चेहर्यावर होतात. याबाबत आता उर्फीने खुलासा केला आहे.
उर्फीने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये उर्फीचा चेहरा सुजलेला दिसतोय. या फोटोला कॅप्शन देत उर्फी म्हणाली, “मला लोकांकडून अशा प्रतिक्रिया मिळतायत की फिलर्समुळे माझा चेहरा जरा जास्तच सुजलाय. मला खूप ॲलर्जी आहे, माझा चेहरा बहुतेक वेळा सुजलेला असतो. मी दर दुसऱ्या दिवशी अशीच उठते आणि माझा चेहरा नेहमी सुजलेला असतो, यामुळे मी नेहमी अस्वस्थ असते. हे फिलर्स नाही आहेत, या अॅलर्जीज आहेत.”
उर्फी पुढे म्हणाली, “इम्युनोथेरपी चालू आहेृ, पण जर तुम्ही मला अशा सुजलेल्या चेहऱ्यामध्ये पाहिलंत तर तुम्ही समजून जा की मला अॅलर्जी झाली आहे. मी माझ्या नेहमीच्या फिलर आणि बोटॉक्सशिवाय काहीही केले नाही, जे मी १८ वर्षांची असल्यापासून करत आहे. जर तुम्हाला माझा चेहरा सुजलेला दिसत असेल तर मी फिलर्स वगैरे नको करायला असे सल्ले देऊ नका, मला फक्त सहानुभूती दाखवा आणि पुढे जा.”
उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत आणि उर्फीच्या चाहत्यांनी तिला सपोर्ट करण्यासाठी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “मी सोशल मीडियावर पाहिलेली उर्फी ही सर्वात प्रामाणिक व्यक्ती आहे, यात शंका नाही.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “लवकर बरी हो, काळजी घे.”
दरम्यान, उर्फी बिग बॉस ओटीटीनंतर चर्चेत आली. उर्फीने याआधी अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. १९ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित झालेला “लव्ह सेक्स और धोका-२” या चित्रपटात उर्फी शेवटची झळकली होती. आता उर्फी तिच्या वेगवेगळ्या फॅशनेबल आउटफिट्समुळे चर्चेत असते.