‘प्लॅनेट मराठी’च्या प्रत्येक वेबसीरीज या कायमच हिट ठरताना दिसतात. आता प्लॅनेट मराठीद्वारे लवकरच एक नवीन वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कंपास’ असे या वेबसीरीजचे नाव आहे. या वेबसीरिजमध्ये उर्मिला कोठारे ही पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. यानिमित्ताने उर्मिलाने एका मुलाखतीत मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल भाष्य केले.
कंपास या वेबसीरीजच्या निमित्ताने उर्मिलाने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत उर्मिलाला तिचा आवडता आयपीएस अधिकारी कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने समीर वानखेडे असं उत्तर देत त्यांच्याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : उर्मिलासोबत बिनसलेल्या नात्यावर आदिनाथ कोठारेने सोडले मौन, म्हणाला “आमच्या दोघात…”
“समीर वानखेडे हे अत्यंत कतृत्ववान आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. माझी आणि त्यांची अनेकदा भेट होत असते. आमचे आणि त्यांचे अगदी घरचे संबंध आहेत. पण एक अधिकारी म्हणूनही ते मला आवडतात”, असे उर्मिला कोठारे म्हणाली.
यानंतर तिला ‘तू समीर वानखेडेंना बघून या पात्रासाठी काही टीप्स वैगरे घेतल्यास का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “हो मी आता त्यांची एक अपॉईंटमेंट घेणार आहे. त्यामुळे ती भेट लवकर होईल. त्यावेळी त्यांना या पात्राबद्दल नक्कीच सांगेन आणि टीप्सही घेईन”, असे तिने म्हटले.
आणखी वाचा : रुचिरा जाधव-रोहित शिंदेमधील दुरावा मिटला, एका कृतीने वेधले लक्ष
सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘कंपास’ (Compass) ही वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरीजमध्ये उर्मिला कानेटकर – कोठारे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, पौर्णिमा डे, खुशबू तावडे, सुयश टिळक, संग्राम साळवी, सौरभ गोखले, धवल पोकळे, राजेंद्र शिसतकर, गिरीश जोशी, आनंद इंगळे, संजय मोने हे कलाकार झळकणार आहे. या वेबसीरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर आणि संतोष रत्नाकर गुजराथी हे करत आहेत.