बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा आगामी ‘बवाल’ हा चित्रपट निर्मात्यांनी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धावर आधारित असून याचे दिग्दर्शन ‘दंगल’ फेम नितेश तिवारी यांनी केले आहे.

हेही वाचा : रितेशने जिनिलीयाला पुन्हा घातली लग्नाची मागणी; नवऱ्याला उत्तर देत देशमुख वहिनी म्हणाल्या, “आता…”

‘बवाल’ चित्रपटाचे कथानक दुसऱ्या महायुद्धावर आधारित असल्याने हा चित्रपट पूर्णपणे व्यावसायिक मनोरंजनाच्या श्रेणीत येत नाही असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माते साजिद नाडियादवाला, जान्हवी कपूर आणि वरूण धवन यांनी एकत्रित चर्चा करून हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. ‘बवाल’ चित्रपट ऑक्टोबर महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्स दिली असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

हेही वाचा : ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, कावेरीच्या जिवाला धोका? नवा प्रोमो पाहून प्रेक्षक झाले नाराज

अभिनेत्री जान्हवी कपूरने या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो गेल्यावर्षी सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘बवाल’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना वरुण धवन आणि जान्हवी कपूर ही नवी जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे. याआधी वरुण-जान्हवीचा ‘बवाल’ सिनेमा ७ एप्रिल २०२३ रोजी रिलीज होणार होता, परंतु काही कारणास्तव निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलून ६ ऑक्टोबर २०२३ केली.

हेही वाचा : “घटस्फोट कधी घेतलास?” कार्तिक-कियाराचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी गोंधळले; अभिनेत्रीने डिलीट केली इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, अभिनेत्री जान्हवी कपूरचा याआधीचा ‘गुड लक जेरी’ चित्रपट सुद्धा ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला होता, तर वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. तसेच ‘बवाल’ चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहेत. नितेश तिवारी लवकरच रामायणावर आधारित एका चित्रपटावर काम सुरु करणार असून यामध्ये अभिनेता रणबीर कपूर रामाची आणि अभिनेत्री आलिया भट्ट सीतेची भूमिका साकारणार आहे.

Story img Loader