अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘बवाल’मुळे चर्चेत आहेत. ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार असून, नुकतीच या चित्रपटाच्या रिलीज डेटची आणि दुबईमध्ये संपन्न होणाऱ्या भव्य कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा : “ताली बजाती नहीं, बजवाती हूं”, सुष्मिता सेनच्या बहुचर्चित ‘ताली’ सीरिजचे पोस्टर प्रदर्शित, अभिनेत्रीच्या लुकने वेधले लक्ष

Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Shiva
Video: “या नात्याचा प्रवास एवढ्यापर्यंतच…”, अखेर शिवा व आशू एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार; मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Pushpa 2 OTT Release Update
‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर Pushpa 2 होणार प्रदर्शित, तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला करार
Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Mandar Jadhav will miss ganpati Temple on the set after the end of the series
Video: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका संपल्यानंतर मंदार जाधवला सेटवरील ‘या’ जागेची येईल खूप आठवण, म्हणाला, “गेली पाच वर्षे…”
zee marathi three serial time slot change
२३ डिसेंबरपासून ‘झी मराठी’वर होणार मोठा बदल! ३ मालिकांच्या वेळा बदलल्या, ‘ही’ सिरीयल होणार बंद, तर नवीन मालिका…

‘बवाल’चित्रपटाचा ट्रेलर भारतात नव्हे तर ८ जुलैला दुबईत प्रदर्शित करण्यात येणार आहे. यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम आणि मुख्य कलाकार दुबईला रवाना होणार आहेत. वरुण धवन, जान्हवी कपूर, दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माता साजिद नाडियादवाला या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुबईत ‘बवाल’चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉंच करण्याची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. चित्रपटासाठी निर्माते साजिद नाडियादवाला यांनी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओसह ११० कोटींचा करार केला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार‘बवाल’चित्रपटाचा प्रीमियर शो पॅरिसमध्ये होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : बहुचर्चित ‘जी ले जरा’ चित्रपटातून प्रियांका चोप्रा बाहेर? चर्चांना उधाण

‘जुडवा २’ आणि ‘कलंक’ चित्रपटानंतर अभिनेता वरुण धवन आणि साजिद नाडियादवाला तिसऱ्यांदा ‘बवाल’ चित्रपटाद्वारे एकत्र येणार आहेत. ८ जुलैला ट्रेलर रिलीज झाल्यावर‘बवाल’चित्रपट २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : “माझे भाऊजी” अंकुश चौधरीच्या बायकोची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाली, “१२ वर्षांनी मी पुन्हा…”

दरम्यान, यापूर्वीचे जान्हवी कपूरचे दोन्ही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. २०२० साली ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ नेटफ्लिक्सवर आणि ‘गुड लक जेरी’ डिस्ने + हॉटस्टारवर २०२२ साली प्रदर्शत झाला होता. तर ‘बवाल’ हा वरुण धवनचा दुसरा चित्रपट आहे, जो थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. २०२० च्या सुरुवातीला, त्याचा ‘कुली नंबर १’ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

Story img Loader