अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘बवाल’मुळे चर्चेत आहेत. ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार असून, नुकतीच या चित्रपटाच्या रिलीज डेटची आणि दुबईमध्ये संपन्न होणाऱ्या भव्य कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
‘बवाल’चित्रपटाचा ट्रेलर भारतात नव्हे तर ८ जुलैला दुबईत प्रदर्शित करण्यात येणार आहे. यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम आणि मुख्य कलाकार दुबईला रवाना होणार आहेत. वरुण धवन, जान्हवी कपूर, दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माता साजिद नाडियादवाला या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुबईत ‘बवाल’चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉंच करण्याची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. चित्रपटासाठी निर्माते साजिद नाडियादवाला यांनी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओसह ११० कोटींचा करार केला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार‘बवाल’चित्रपटाचा प्रीमियर शो पॅरिसमध्ये होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : बहुचर्चित ‘जी ले जरा’ चित्रपटातून प्रियांका चोप्रा बाहेर? चर्चांना उधाण
‘जुडवा २’ आणि ‘कलंक’ चित्रपटानंतर अभिनेता वरुण धवन आणि साजिद नाडियादवाला तिसऱ्यांदा ‘बवाल’ चित्रपटाद्वारे एकत्र येणार आहेत. ८ जुलैला ट्रेलर रिलीज झाल्यावर‘बवाल’चित्रपट २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा : “माझे भाऊजी” अंकुश चौधरीच्या बायकोची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाली, “१२ वर्षांनी मी पुन्हा…”
दरम्यान, यापूर्वीचे जान्हवी कपूरचे दोन्ही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. २०२० साली ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ नेटफ्लिक्सवर आणि ‘गुड लक जेरी’ डिस्ने + हॉटस्टारवर २०२२ साली प्रदर्शत झाला होता. तर ‘बवाल’ हा वरुण धवनचा दुसरा चित्रपट आहे, जो थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. २०२० च्या सुरुवातीला, त्याचा ‘कुली नंबर १’ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.