बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या ‘बवाल’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. दुबईतील एका कार्यक्रमादरम्यान हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : सुपरहिट ठरलेल्या ‘जब वी मेट’ चित्रपटाचे नाव कोणी सुचवले? शाहिद कपूरने केला खुलासा; म्हणाला, “३ नावांमध्ये आम्ही…”

‘बवाल’ चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित केलेल्या ३ मिनिटे ३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना वरुण-जान्हवीच्या गोड प्रेमकहाणीत थरारक ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळेल. वरुण धवन आणि जान्हवी कपूर या दोघांनाही पहिल्यांदाच ‘बवाल’च्या निमित्ताने एकत्र काम केले आहे. चित्रपटात जान्हवी कपूरने ‘निशा’, तर वरुण धवनने ‘अजय’ ही भूमिका साकारली आहे.

हेही वाचा : “माझ्याकडे पैसे नव्हते”, स्मृती इराणींना आठवले संघर्षाचे दिवस; म्हणाल्या, “बाळ झाल्यावर २ दिवसांनी…”

ट्रेलरमध्ये सुरुवातीला वरुण धवन एका इतिहास शिक्षकाची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुढे त्याचे लग्न होते आणि दोघेही फिरायला युरोपला जातात. यानंतर गोष्टी कशा बदलतात तसेच दुसरे महायुद्ध आणि हिटलरचे शहर याचा वरुण-जान्हवीच्या प्रेमकथेशी काय संबंध आहे याचा उलगडा २१ जुलै २०२३ रोजी होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने ट्रेलर शेअर करत “प्रेम ते ‘बवाल’पर्यंतचा प्रवास!” असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा : “लहानपणी शारीरिक शोषण…”, शाहिद कपूरने ४ वर्षांनी केला ‘कबीर सिंग’मधील ‘त्या’ वादग्रस्त सीनबाबत खुलासा

दरम्यान, ‘बवाल’ चित्रपटाच्या निमित्ताने वरुण धवन आणि जान्हवी कपूरची नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २१ जुलैला ‘बवाल’ अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.