‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. ‘बिग बॉस’ हिंदीचे आतापर्यंत १६ सीझन यशस्वीरीत्या पार पडले. तर याचबरोबर यापैकी एक सीझन ओटीटीवरही झाला होता. तर त्यानंतर आता ‘बिग बॉस ओटीटी २’ची सर्वत्र चर्चा आहे. आता या कार्यक्रमात मराठी चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेली एक अभिनेत्री दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस ओटीटी २’च्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन सलमान खानच करणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे. हा रिॲलिटी शो १७ जूनपासून जिओ सिनेमावर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे आधीचे सर्वच सीझन त्यातील स्पर्धकांमुळे चांगलेच रंगले. त्यामुळे आता या नवीन पर्वात कोण कोण सेलिब्रिटी दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता या शोच्या स्पर्धकांबद्दल मोठी अपडेट आली आहे.

आणखी वाचा : “दादा-वहिनी…,” ‘वेड’ला IIFA पुरस्कार मिळाल्यावर दीपशिखा देशमुखची खास पोस्ट, जिनिलीयाने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाली…

या नव्या सीझनमध्ये काही दिवसांपूर्वी एका तुफान गाजलेल्या मराठी चित्रपटातून समोर आलेली अभिनेत्री या नव्या सीझनमध्ये दिसणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे जिया शंकर. जिया शंकर ही रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटात तिने ‘निशा’ हे पात्र साकारलं होतं. तर ‘वेड’च्या आधी जिया दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकली आहे. आता तिचं नाव ‘बिग बॉस ओटीटी २’साठी फायनल करण्यात आलं आहे.

हेही वाचा : Video: जिनिलीयाने मागितली रितेश देशमुखची माफी, पत्नीने सॉरी म्हणताच अभिनेत्याने केलं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल

मीडिया रिपोर्टनुसार, पलक परसवानी ही देखील ‘बिग बॉस ओटीटी २’ च्या या सीझनमधील दुसरी स्पर्धक म्हणून नक्की झाली आहे. तर त्यामुळे आता हा सीझन चांगलाच रंगणार असल्याचं बोललं जात आहे. ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ved fame actress jiya khan will be starring in bigg boss ott 2 rnv