‘बिग बॉस ओटीटी’चं दुसरं पर्व शेवटच्या टप्प्यात आलं आहे. त्यामुळे सध्या स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या वीकेंडमध्ये घरातून दोन स्पर्धक बाहेर पडले. जैद हैदीद व अविनाश सचदेव हे दोघे रविवार बेघर झाले. असे असताना बिग बॉसनं मिड वीक एविक्शन करून प्रेक्षकांना धक्का दिला आहे. ‘वेड’ फेम जिया शंकरचा बिग बॉस ओटीटीमधला प्रवास आता थांबला असून, टॉप पाच स्पर्धक शोला मिळाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रविवारी दोन स्पर्धक बाहेर गेल्यानंतर टॉप सहा स्पर्धक घरात आनंद साजरा करीत होते; पण बिग बॉसनं यादरम्यानच नॉमिनेशन्स प्रक्रिया घेतली. यामध्ये तीन स्पर्धक म्हणजे जिया शंकर, एल्विश यादव व मनीषा रानी हे बिग बॉस ओटीटीमधून बाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले. त्यामुळे या आठवड्यातील शेवटच्या या तीन नॉमिनेट स्पर्धकांमधून एकाचा पत्ता कट होणार हे प्रेक्षकांना माहीत होतं; पण बिग बॉसनं अचानक मिड वीक एविक्शन घेतलं. मतं कमी मिळाल्यामुळे जिया शोमधून बाहेर गेली. त्यामुळे जियाच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिला ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा; म्हणाले, “‘माहेरची साडी’…”

अचानक बिग बॉस ओटीटीमधून जिया बाहेर पडल्यामुळे सध्या तिचे चाहते ट्वीटवर काही व्हिडीओ शेअर करीत प्रतिक्रिया देत आहेत. तसेच याबद्दल नाराजीसुद्धा व्यक्त करीत आहेत. “जिया बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व जिंकण्यासाठी पात्र होती”, असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. तर जियाच्या काही चाहत्यांनी शोच्या निर्मात्यांवर आरोप केले आहेत. “शोमध्ये सुरुवातीपासून जियाला कमजोर दाखवून तिला आता बाहेर काढण्यात आलं,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

हेही वाचा – बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला अभिनेता शायनी अहुजाला उच्च न्यायालयाकडून दिलासा; ‘या’साठी मिळाली परवानगी

बिग बॉसच्या घराबाहेर होताना जिया खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ती शेवटी म्हणाली, “बिग बॉस तुम्ही या घरात मला बोलावतं, इथे राहण्याची संधी दिलीत, त्यासाठी धन्यवाद. या घरातून बरंच काही घेऊन जात आहे. माझ्या चाहत्यांची मी खूप खूप आभारी आहे. आपण जिंकलो आहोत. मी आपली खरी ट्रॉफी बाहेर घेऊन येत आहे. इथपर्यंतच्या प्रवासात साथ दिलीत त्यासाठी धन्यवाद.”

हेही वाचा – “बॉडीमुळे नाही, तर….”, अभिषेक बच्चनने नवोदित अभिनेत्यांना दिला सल्ला; म्हणाला…

दरम्यान, जिया घराबाहेर झाल्यामुळे आता ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाला टॉप पाच सदस्य मिळाले आहेत. पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनिषा रानी व बेबिका धुर्वे या स्पर्धकांमधून आता दुसऱ्या पर्वाचा विजेता कोण ठरतं, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.