बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व जोरदार सुरू आहे. हे पर्व प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रत्येक आठवड्याला काही ना काही घडतं आहे; ज्यामुळे शोचा होस्ट सलमान खान विकेंडच्या वारावर नाराज झाल्याचं पाहायला मिळतं आहे. या दुसऱ्या पर्वातून नुकतीच वाइल्ड कार्ड एन्ट्री आशिक भाटिया बाहेर झाली आहे. पण, सध्या ‘वेड’फेम अभिनेत्री जिया शंकरने खासगी आयुष्याबद्दल केलेला खुलासा चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉस ओटीटीच्या या घरात प्रत्येक सदस्य आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसतो. आता जिया शंकर अभिषेक मल्हान समोर स्वतःच्या कुटुंबाबद्दल उघडपणे बोलताना पाहायला मिळाली. या आठवड्याच्या नॉमिनेशनमध्ये जियानं अविनाशचं नाव घेतलं. यामुळे घरात भांडणाला सुरुवात झाली. या दरम्यान अभिषेक जियाला समजवण्याचा प्रयत्न करत होता की, तिनं एका चांगल्या मित्राला नॉमिनेट करून चुकी केली आहे. यावेळी जियाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली की, “मी स्वतःसाठी गेम खेळू इच्छिते, कारण मला सध्या याची अधिक गरज आहे.”

हेही वाचा – Video: “हा शेवट कसा असू शकतो?” ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेचा शेवट बघून नेटकऱ्यांचा प्रश्न; म्हणाले, “आम्हाला पशा-अंजीचं…”

पुढे जियानं बोलता बोलता तिची एकटी आई असल्याचा आणि तिच्या कुटुंबात कोणताही ताळमेळ नसल्याचा खुलासा केला. हे ऐकून अभिषेकनं तिला विचारलं की, ‘तुला भाऊ आहे का?’ यावर अभिनेत्री म्हणाली की, “नाही, माझ्या कुटुंबात फक्त मी आणि माझी आई आहे. वडिलांशिवाय संपूर्ण आयुष्यात मला खूप अडचणींचा सामना करावा लागला.” त्यानंतर अभिषेकने तिचं सांत्वन करून तिला शांत केलं.

हेही वाचा – अभिनेता प्रियदर्शन जाधवने न्यूज चॅनलमध्ये केलं होतं काम; ज्येष्ठ पत्रकाराच्या ‘त्या’ वाक्यांनंतर सोडलं काम

मग जिया म्हणाली की, “माझ्यासारखं आयुष्य कोणीच जगलं नाही. माझे वडील नाहीयेत आणि एकट्या आईबरोबर राहणं काही सोप नाहीये. माझ्या कुटुंबात अजिबात ताळमेळ नाही. मला भाऊ नाही, फक्त मी आणि माझी आई आहे. त्यामुळे जैद हदीदच्या बोलण्याचा माझ्यावर खूप परिणाम होतो. कारण तो स्वतःला माझ्या वडिलांसारखा असल्याचं मानतो, पण तो माझ्या वडिलांप्रमाणे नाहीये.”

हेही वाचा – फेक ऑडिशनच्या जाळ्यात अडकली होती मराठमोळी अभिनेत्री; स्वत: खुलासा करत म्हणाली, “आतल्या खोलीत नेलं अन्…”

दरम्यान, बिग ओटीटीचं हे दुसरं पर्व संपण्यासाठी काही आठवडे बाकी राहिले आहेत. आता या शोमध्ये अभिषेक मल्हान, जिया शंकर, मनीषा रानी, जैद हदीद, एल्विश यादव, अविनाश सचदेव, बेबिका ओबेरॉय आणि पूजा भट्ट हे स्पर्धक राहिले आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ved fame actress jiya shankar reveals her personal life in bigg boss ott 2 pps