‘बिग बॉस ओटीटी २’चे स्पर्धक शो संपल्यानंतरही चर्चेत असतात. जेव्हा हा कार्यक्रम प्रसारित झाला तेव्हा जिया शंकरने अभिषेक मल्हानबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि त्याचा ‘अभिया’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर अनेकदा ट्रेंड झाला होता. तर दुसरीकडे, अभिषेक आणि मनीषा राणीच्या बाँडलाही त्यांच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले आणि त्यांचा ‘अभिशा’ हा हॅशटॅगही वारंवार ट्रेंड झाला. हा शो संपल्यानंतर ‘अभिषा’च्या चाहत्यांनी जियावर मनीषाची बदनामी करण्यासाठी पापाराझींना पैसे दिल्याचा आरोप केला. आता जियाने या आरोपांवर आपले मौन तोडले आहे.
जियाने मनीषा राणीची बदनामी करण्यासाठी पापाराझींना ४ लाख रुपये दिले होते, असे बोलले जात होते. आता यावर प्रतिक्रिया देताना जियाने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्यात ती म्हणाली, “मित्रांनो, मी मनीषाचे चाहते किंवा ‘अभिषा’चे चाहते म्हणजे मला फक्त काय चालले आहे हे सांगायचे आहे? जसे की, तुम्ही लोक काही फेव्हरेट आहात, तर काही फेव्हरेट आहात. मला अभिषाच्या चाहत्यांना फक्त एवढेच सांगायचे आहे की हे सगळे काय सुरू आहे? कोणी तुमचे आवडते आहेत तर कोणी दुसऱ्यांचे आवडते आहेत.”
पुढे ती म्हणाली, “तुम्हाला हे सगळे करण्याची गरज नाही. मी पापाराझींना मनीषाला बदनाम करण्यासाठी ४ लाख रुपये दिले असे तुम्ही व्हायरल करत आहात. ४ लाख नाही १ कोटी दिले. चांगली मस्करी आहे ही? अशा काही गोष्टी तुम्ही माझ्याबद्दल पसरवत आहात. काही पसरवण्याच्या आधी ती गोष्ट नीट तपासून पाहा. १ कोटीचे तुम्ही लोकांनी ४ लाख केलेत. एवढी मेहनत यासाठीच तर करत होते मी.”