भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. याच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर: सिक्रेट फाइल्स’ ही हिंदी वेबसीरज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या वेबसीरिजच्या शूटींगला सुरुवात झाली आहे.

‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या वेबसीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता सौरभ गोखले वीर सावरकरांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची पहिली झलक समोर आली होती. या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला.
आणखी वाचा : “हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “तिला भूल देणंही…”

Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

“सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलेच पाहिजे असे आम्हाला वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नसून ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील. त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते तसे मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

सावरकर यांचे जीवन हा जवळपास १०० वर्षांचा इतिहास आहे. यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे, राजकीय, सामाजिक स्वार्थांसाठी तयार केले जाणारे नॅरेटिव्ह पुसले जावे असा आमचा प्रयत्न असणार आहे. सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते अनफोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे”, अशी माहिती दिग्दर्शक योगेश सोमण यांनी दिली.

आणखी वाचा : Video : “तुम्हाला रील बनवण्याचे पैसे दिले नाही” प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर वैतागला दिग्दर्शक, कारण…

आतापर्यंत सावरकर यांच्यावर आधारित नाटक, चित्रपट आले, परंतु वेबसीरिजच्या माध्यमात प्रथमच ही मालिका समोर येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनावर ही वेबसीरिज आधारित असणार आहे. ही सीरिज चार सीझनची असणार आहे. यात पहिल्या सिझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे १८८३ ते मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा कालखंड पाहता येणार आहे.

दरम्यान ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ या हिंदी वेबसीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार आहे. याची निर्मिती डॉ. अनिरबन सरकार करणार आहेत. ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ ही वेब सीरिज पुढच्या वर्षी २६ फेब्रुवारीला वीर सावरकरांच्या पुण्यतिथीला प्रदर्शित केली जाणार आहे.