ब्लॉकबस्टर चित्रपट बनवायचा असेल तर त्यासाठी खूप मोठे बजेट असावे लागत नाही. कथा आणि कलाकार चांगले असतील तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होऊ शकतो. याचेच उत्तम उदाहरण काही बॉलीवूड चित्रपट आहेत, या चित्रपटांचे बजेट १० कोटींहून कमी होते, पण त्यांनी दमदार कमाई केली.

भेजा फ्राय

२००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘भेजा फ्राय’ हा चित्रपट केवळ ६० लाख रुपये खर्चून बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८ कोटींहून अधिक कमाई केली होती. हा चित्रपट नंतर हॉलिवूडमध्ये ‘डिनर फॉर श्मक्स’ या नावाने बनवला गेला. ‘भेजा फ्राय’मध्ये रजत कपूर, विनय पाठक, सारिका, मिलिंद सोमण आणि रणवीर शौरीसारखे हे कलाकार होते. हा चित्रपट युट्यूबवर उपलब्ध आहे.

rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
SEBI found Bharat Global Developers Limited guilty of serious fraud
वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 
central railway loksatta
प्रवासी सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; अत्याधुनिकीकरणामुळे खानपान सेवा व गैर-भाडे महसुलात…
Pushpa 2 Box Office Collection
Pushpa 2 Box Office Collection Day 17: ‘पुष्पा २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

पिपली लाइव्ह

आमिर खानची निर्मिती असलेला ‘पीपली लाइव्ह’ चित्रपट फक्त १० कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४८ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि आत्महत्या दाखवण्यात आल्या होत्या. ‘पीपली लाइव्ह’ला ८३ व्या ऑस्करसाठी पाठवण्यात आलं होतं, पण तो शर्यतीतून बाहेर पडला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

फक्त दोन कोटींचे बजेट अन् चित्रपटाने ४२ वर्षांपूर्वी कमावले होते १०० कोटी, तुम्ही पाहिलाय का हा बॉलीवूड सिनेमा?

नो वन किल्ड जेसिका

मॉडेल जेसिका लालच्या जीवनावर आधारित ‘नो वन किल्ड जेसिका’ हा चित्रपट ९ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४६ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात विद्या बालन आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होत्या. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

फक्त तीन कलाकार, १५ दिवसांत शूटिंग अन्…, ‘या’ भयपटाने केलेली बक्कळ कमाई, कुठे पाहता येणार सिनेमा? जाणून घ्या

कहानी

विद्या बालनचा ‘कहानी’ चित्रपट २०१२ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट जवळपास ८ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०४ कोटींची कमाई केली होती. इतकंच नाही तर सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

अवघे आठ कोटी बजेट, कमावले तब्बल १०४ कोटी; विद्या बालनचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट तुम्ही पाहिलाय का?

पान सिंह तोमर

‘पान सिंह तोमर’ चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. इरफान खानच्या या चित्रपटाचे बजेट फक्त आठ कोटी रुपये होते. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर १९ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटातील पान सिंह तोमरच्या भूमिकेसाठी इरफानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

विक्की डोनर

आयुष्मान खुरानाचा डेब्यू चित्रपट ‘विकी डोनर’ कमी बजेटच्या पण जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आहे. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘विकी डोनर’चे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले होते.

फक्त पाच कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास ६७ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.

Story img Loader