zara hatke zara bachke OTT release : बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’ अखेर ११ महिन्यांनी ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी जुन महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.
या रोमँटिक, कॉमेडी सिनेमात प्रेम, लग्न आणि घटस्फोटाची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. लक्ष्मण उटेकर दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता अखेर या चित्रपटाला ओटीटी प्रदर्शनाचा मुहूर्त मिळाला असून तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. आपण घरबसल्या हा सिनेमा केव्हा आणि कुठे पाहू शकता ते जाणून घेऊयात.
कधी व कुठे पाहता येईल ‘जरा हटके जरा बचके’
जिओ सिनेमाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर विक्की कौशलला टॅग करत चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. “सहकुटुंब लग्न केलं होतं, आता सहकुटुंब घटस्फोटही होईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी घटस्फोटासाठी नक्की या” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘जरा हटके जरा बचके’ १७ मे पासून जिओ सिनेमावर पाहता येईल.
Video: माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीला पाहिलंत का? ‘तो’ खास व्हिडीओ पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर
११ महिन्यांपूर्वी थिएटरमध्ये झाला होता प्रदर्शित
हा चित्रपट २ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यापूर्वी हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार होता, परंतु या चित्रपटाला जिओ सिनेमावर स्ट्रीम करण्याची तारीख मिळू शकली नाही, परिणामी प्रदर्शन पुढे ढकललं होतं.
हेही वाचा – अर्पिता खानपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर आयुष शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, “मी माझ्या मुलाला…”
चित्रपटाची कथा नेमकी काय?
‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाची कथा एका विवाहित जोडप्याभोवती फिरते. या चित्रपटात विकी कौशलने कपिल दुबेची भूमिका साकारली आहे आणि साराने त्याच्या पत्नीची सौम्याची भूमिका साकारली आहे. हे दोघेही प्रेमविवाह करतात, पण कपिलचं कुटुंब मोठ असल्याने दोघांना प्रायव्हसी मिळत नाही. प्रेमाचे काही क्षण एकत्र घालवता यावे, यासाठी हे दोघेही सरकारी योजनेतून स्वत:साठी फ्लॅट मिळवण्यासाठी बनावट घटस्फोट घेतात. त्यानंतर पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट पाहावा लागेल. अवघ्या ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११५.८९ कोटींची कमाई केली होती.