दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा, बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. अनन्याची या चित्रपटामधील भूमिका पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळत होता. १२० कोटी रुपयांचं बजेट असलेला ‘लायगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ४० कोटी रुपयांच्या आसपासच गल्ला जमवू शकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : “शिल्पा शेट्टीमुळे तुला लोक…” ट्रोलर्सना राज कुंद्राचं चोख उत्तर

लायगर’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विजय देवरकोंडाचा लूक पाहून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. विजयसह अनन्या देखील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभरात फिरली. मात्र जोरदार प्रमोशन करूनही चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. आता हा चित्रपट हिंदी भाषेत प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे.

२१ सप्टेंबर रोजी ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’नी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून ही माहिती शेअर केली होती. त्यामुळे या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार हे तेव्हा निश्चित झाले होते. परंतु कोणत्या तारखेला हा हिंदी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी विजय आणि अनन्याचे चाहते उत्सुक होते. या प्रश्नाचा उलगडा अखेर झाला आहे. ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’नी नुकताच त्यांनी एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यानुसार या आठवड्यात २१ ऑक्टोबर रोजी लायगरचे हिंदी व्हर्जन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : चित्रपटांत अपयश मिळाल्यावर अनन्या पांडेची ओटीटीकडे वाटचाल, ‘या’ सिरीजमध्ये साकारणार मुख्य भूमिका

या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण हिंदी चित्रपटसृष्टीत त्याचे पदार्पण अयशस्वी ठरलं. विजय देवरकोंडाबरोबर अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन, राजीव रॉय, मकरंद देशपांडे या कलाकारांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका सकारल्या आहेत. या चित्रपटातून प्रसिद्ध अमेरिकन बॉक्सर माईक टायसनचे भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पणदेखील होते.