ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा अनेक वेब सीरिज आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘मिर्झापूर’. काइम-थ्रीलर या वेब सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले; जे सुपरहिट झाले. त्यानंतर आता या सुपरहिट सीरिजचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच एमजीए स्टुडिओ आणि एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रोडक्शनने ‘मिर्झापूर’ चित्रपटाची घोषणा केली. ‘मिर्झापूर’चा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. ज्यामध्ये कालीन भैय्या, गुड्डू पंडीत, मुन्ना भैय्या आणि कम्पाउंडर पाहायला मिळत आहे. २०२६ला ‘मिर्झापूर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जसं मुन्ना भैय्याचं कमबॅक दाखवलं जाणार आहे. तसंच आणखी एक व्यक्तिरेखा परतण्याची चर्चा सध्या रंगली आहे.

हेही वाचा – Video: ‘मुंज्या’, ‘स्त्री २’नंतर आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाच्या ‘थामा’ चित्रपटाची घोषणा, पाहायला मिळणार थरारक प्रेम कहाणी

‘मिर्झापूर’ चित्रपटात गुड्डू भैय्याचा डावा हात बबलू पंडित पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘मिर्झापूर’च्या दुसऱ्या सीझनमध्ये बबलू पंडितला जीव गमवावा लागतो, असं दाखवण्यात आलं आहे. ‘मिर्झापूर’मधीला हा ट्विस्ट अनेकांसाठी धक्कादायक होता. कारण बबलू पंडित ही व्यक्तिरेखा अनेक व्यक्तिरेखांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत होती. त्यामुळे जेव्हा बबलू पंडितची एक्झिट दाखवण्यात आली तेव्हा अनेक प्रेक्षकांची मनं दुखावली गेली. पण, आता याच प्रेक्षकांना बबूल पंडितच्या कमबॅकची आशा आहे.

हेही वाचा – Video: “…अन् तो अनार माझ्या आईच्या साडीला लागला”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजने सांगितला बालपणीचा ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

अभिनेता विक्रांत मेस्सीने साकारलेला बबलू पंडित खूप मेहनत करून आयएएस अधिकारी बनून पुन्हा ‘मिर्झापूर’ चित्रपटात एन्ट्री करू शकतो, असा अंदाज प्रेक्षक लावत आहे. तसंच छोटे त्यागी म्हणजेच विजय वर्मा आणि माधुरी यादव उर्फ ईशा तलवारसह अनेक व्यक्तिरेखा ‘मिर्झापूर’ चित्रपटातून हटवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – Video: ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘मिर्झापूर’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा गुरमीत सिंह यांच्यावर आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल, मुन्ना त्रिपाठी, अभिषेक बनर्जीसह इतर कलाकारदेखील पाहायला मिळणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘मिर्झापूर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनी प्राइम मेबर्स भारतासह २४०हून अधिक देशांमध्ये हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात.