बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई एमएमबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘थ्री इडियट्स’ अशा प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे अनेक सिनेमे लोकप्रिय असून त्यांच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता राजकुमार हिरानी ओटीटीवर पदार्पण करत आहेत. ‘प्रीतम पेड्रो’ या सिरीजची ते निर्मिती करणार असून यातून त्यांचा मुलगा वीर हिरानी अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार आहे. यात एक प्रसिद्ध अभिनेता खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विक्रांत मॅसी असे त्या अभिनेत्याचे नाव आहे. विक्रांतने त्याच्या अभिनय कौशल्याने चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपली छाप सोडली आहे. २०२४ मध्ये विक्रांतचे ‘ब्लॅकआउट’, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’, ‘सेक्टर ३६’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ हे चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. या सर्व चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर काही विक्रांतने अलीकडेच त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी अभिनयातून काही काळ ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. मात्र, आता राजकुमार हिरानी यांच्या आगामी वेब सीरिजमध्ये त्याने खलनायकाची भूमिका स्वीकारल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

हेही वाचा…‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी

PeepingMoon च्या वृत्तानुसार, विक्रांत मॅसीने राजकुमार हिरानी यांची पहिली वेब सीरिज ‘प्रीतम पेड्रो’मध्ये नायकाची भूमिका नाकारून खलनायकाची भूमिका निवडली आहे. शोच्या शूटिंगच्या वेळापत्रकामुळे त्याने ही निवड केली आहे. ‘प्रीतम पेड्रो’ सीरिजमध्ये राजकुमार हिरानी यांचा मुलगा वीर हिरानी आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत आहेत. वीर हा टेक-सेव्ही पोलीस अधिकारी म्हणून विक्रांतच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अर्शद वारसी पारंपरिक तपास पद्धतींवर अवलंबून राहणाऱ्या अनुभवी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

‘प्रीतम पेड्रो’ वेब सीरिजमधून राजकुमार हिरानी अर्शद वारसीबरोबर १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करत आहेत. यात , “राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अविनाश अरुण, जे जयदीप अहलावतच्या ‘पाताल लोक’ या अॅमेझॉन प्राइम सीरिजसाठी प्रसिद्ध आहेत, ते अॅड फिल्म दिग्दर्शक अमित सत्यवीर सिंग यांच्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून या शोमध्ये सहभाग झाले आहेत. या सीरिजची निर्मिती राजकुमार हिरानी यांची निर्मितीसंस्था करत आहे. सध्या मुंबईत या शोचे चित्रीकरण सुरू आहे.”.

हेही वाचा…‘पाताल लोक २’ प्रदर्शित होण्याआधी अभिनेता जयदीप अहलावतच्या वडिलांचे निधन

विक्रांत मेस्सीने ‘द साबरमती रिपोर्ट’ प्रदर्शित झाल्यानंतर एक पोस्ट लिहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्या पोस्टवरून तो अभिनयातून निवृत्ती घेणार असे अंदाज त्याच्या चाहत्यांनी बांधले होते. मात्र, त्याने नंतर या चर्चांवर उत्तर देत तो अभिनयातून काही काळ ब्रेक घेत असल्याचे स्पष्ट केले होते. आरजे रोहिणीबरोबरच्या राउंडटेबल चर्चेत, विक्रांतने सांगितले, “आता मला वाटत आहे की, मी सारख्याच प्रकारच्या गोष्टी करत आहे. चांगल्या कामासाठीचे निकष कमी झाले आहेत.” विक्रांतने या मुलाखतीत सांगितले होते, “मी लग्न केले, पण पत्नीबरोबर हनिमूनला जाऊ शकलो नाही. तिच्याबरोबर नीट वेळ घालवू शकलो नाही. मला मुलगा झाला, त्याने मला कधी ‘पप्पा’ म्हटले, तो माझ्या मागे चालायला लागला, त्याला कधी दात आले हे मला पाहता आलं नाही. मी त्याला फक्त फोटो आणि व्हिडीओवर मोठे होताना पाहतो आहे.”

हेही वाचा…Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या

विक्रांतच्या आगामी प्रकल्पांबाबत बोलायचे झाल्यास, तो ‘आंखों की गुस्ताखियां’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये डेब्युटंट शनाया कपूरही मुख्य भूमिकेत आहे. संतोष सिंग दिग्दर्शित हा चित्रपट रस्किन बाँडच्या पुस्तकावर आधारित एकप्रेमकथा आहे. त्याशिवाय, तो रणवीर सिंगबरोबर ‘डॉन ३’ मध्येही दिसणार आहे, ज्याचे चित्रीकरण २०२५ च्या जुलैमध्ये सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikrant massey to play villain in rajkumar hirani ott debut series pritam pedro psg