Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात सध्या वातावरण तापलं आहे. “भाभी अच्छी लगती है”, या विशाल पांडेच्या विधानावरून ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाला एक वेगळं आलं आहे. दुसरी पत्नी कृतिकाविषयी केलेलं हे विधान ऐकून अरमान मलिकने विशालच्या कानशिलात लगावली. त्यामुळे अरमान विरोधात सोशल मीडियावर कलाकार मंडळींसह पांडे कुटुंब आवाज उठवताना दिसत आहेत. अशातच विशाल पांडेच्या आई-वडिलांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत विशाला पांडेचे आई-वडील भावुक झाल्याचं पाहायला मिळत असून त्यांनी अरमान मलिकला शोमधून बाहेर काढण्याची विनंती ‘बिग बॉस’ला केली आहे.
विशाल पांडेच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या आई-वडिलांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सुरुवातीला विशालची आई म्हणाली, “‘बिग बॉस’ माझी तुम्हाला विनंती आहे की, त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढा, ज्याने माझ्या मुलावर हात उचलला. आजपर्यंत आम्ही त्याच्यावर हात उचलला नाही. आम्ही त्याला प्रेमाने वाढवलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात कोणी त्याच्यावर हात उचलले, असा विचार देखील केला नव्हता. आम्हाला आता सहन होत नाहीये. मी जेव्हापासून हे ऐकतेय, तेव्हापासून खूप त्रास होतोय.”
हेही वाचा – Video: विकी कौशलसारखा डान्स करताना पृथ्वीक प्रतापच्या आईनं केलं असं काही…; नेटकरी करतायत कौतुक
पुढे विशालचे वडील म्हणाले, “आमचा व्हिडीओ बनवण्याचा मागचा हेतू हाच आहे की, काल जो एपिसोड आला होता. त्यात दाखवण्यात आलं की, विशाल स्वतःला फेक दाखवत आहे वगैरे. पण विशाल जे आहे तेच तो तिथे दाखवत आहे. त्याचा एकच मुखवटा आहे, दोन किंवा तीन नाही. तो जसा आहे तसाच तो तिथे दिसत आहे. दुसरा मुद्दा त्याच्यावर चुकीचे आरोप लावले जात आहेत. माझ्या मुलाचा स्वभावही तसा नाहीये. तुम्ही बोलला की, सगळेच आई-वडील असं म्हणतात. पण तसं नाहीये. काही जण म्हणतं आहेत, विशालने समोर बोललं पाहिजे होतं. तर तुम्ही व्हिडीओ नीट पाहा. विशालने ती गोष्ट कृतिकासमोर बोलली आहे की, ‘वहिनी तू बिना मेकअपही सुंदर दिसते. एखाद्याचं कौतुक करणं हे माझ्या मते चुकीच नाहीये.”
त्यानंतर विशाल वडील भावुक झाले आणि म्हणाले, “अरमानने माझ्या मुलाला जी कानशिलात लगावली. त्याप्रकरणी माझी बिग बॉसला, निर्मात्यांना हात जोडून विनंती आहे की, अरमानला घराबाहेर काढा. आमचं कुटुंब असं नाहीये. आम्ही खूप साधी माणसं आहोत. माझा मुलगा मेहनतीने तिथंपर्यंत पोहोचला आहे. कोणाच्या पाठिंब्याने तो तिथे पोहोचला नाहीये. स्वतःच्या मेहनतीने त्यानं सगळं मिळवलं आहे आणि मला त्याचा गर्व आहे. त्यामुळे मी बोलने की, विशाल काळजी करू नको. आम्ही तुझ्याबरोबर आहोत.”
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात एखाद्यावर हात उचलण्याची परवानगी नाहीये. हा बिग बॉसचा सर्वात मोठा नियम आहे. याच नियमाचं उल्लंघन अरमानने केलं. त्यामुळे अरमान घराबाहेर होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. पण तसं झालं नाही. त्यामुळे आता विशाल पांडेचे चाहते आणि कुटुंब अरमानला घराबाहेर काढण्यासाठी ‘बिग बॉस’ला विनंती करताना दिसत आहेत.