विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिक कमाई केली होती. आता विवेक अग्रिहोत्री ‘द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ सीरिज घेऊन येत आहेत. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटात पीडितांची कथा दाखवण्यात आली होती. कलाकारांनी पीडितांची भूमिका निभावली होती. पण आता ‘द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ सीरिजमध्ये पीडित स्वतः त्यांचा थरारक अनुभव सांगताना दिसणार आहेत. लवकरच ‘झी ५’वर ‘द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ सीरिज प्रदर्शित होणार आहे. आज या सीरिजचा २ मिनिटांचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. यामध्ये पीडित लोकं आपले अनुभव सांगताना दिसत आहेत.
हेही वाचा – “स्टंट कर…”, ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये जखमी झालेल्या शिव ठाकरेला आईने दिलेला सल्ला
ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक महिला म्हणते की, ‘कश्मीरमध्ये यश चोप्रा चित्रपट करत होते, हे तुम्ही पाहत होता. कश्मीरमधला शिकारा पाहत होता. परंतु यापलीकडे एक वेगळा कश्मीर होता, जो आम्ही पाहत होतो.’ त्यानंतर कश्मीरमधील त्या काळातील दहशतीचे दृश्य दाखवण्यात आले आहे. पुढे या ट्रेलरमध्ये विवेक अग्निहोत्री बोलताना दिसत आहेत की, ‘भारताच्या इतिहासात कदाचित हे कधीच झालेलं नाही.’ तसेच या टीझरच्या शेवटी पल्लवी जोशी ‘या कश्मिरी पंडितांचं नेमकं सत्य काय होतं?’ हा प्रश्न उपस्थितीत करताना दिसतं आहे. ‘द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ ट्रेलर पाहून आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पण ही सीरिज कधी प्रदर्शित होणार हे आता येत्या काळात समजेल.
हेही वाचा – आता मोठ्या पडद्यावर बिग बी साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका? चित्रपटाची कहाणी काय असणार जाणून घ्या
हेही वाचा – इर्शाळवाडी गावाचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत गिरीश ओक म्हणाले, “आताच्या त्रासापेक्षा नंतरची हळहळ जीवघेणी”
दरम्यान, या नव्या सीरिजबाबत विवेक अग्निहोत्री एका कार्यक्रमात म्हणाले की, ‘द कश्मीर फाईल्स’चा हा सीक्वेस प्रेक्षकांचे डोळे उघडवणारा आहे आणि अंगावर शहारे आणणार आहे. जेव्हा आम्ही शतकानुशतके राहणाऱ्या काश्मिरी पंडितांची कथा जगाला सांगण्याचे ठरवले होते. तेव्हापासून आम्ही या प्रोजेक्टवर काम सुरू केले होते.