Horror Movies On Holi Long Weekend: होळीचा सण असल्याने सलग तीन दिवसांची सुट्टी आहे. काही लोक वीकेंडला कुटुंबासह बाहेर जातील, तर काही लोक घरी वेळ घालवतील. वीकेंडला काय करायचं असा विचार तुम्ही करत असाल तर प्राइम व्हिडीओवरील काही चित्रट तुम्ही पाहू शकता. आज आम्ही तुम्हाला प्राइम व्हिडीओवरील टॉप ५ भयपटांबद्दल सांगणार आहोत. हे चित्रपट पाहून तुम्ही हैराण व्हाल.

भूत

Bhoot on OTT : राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या सिनेमात उर्मिला मातोंडकर, अजय देवगण, फरदीन खान आणि रेखा यांच्यासह अनेक स्टार्स होते. हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. त्याची कथा खूपच रंजक आहे. भूत हा बॉलीवूडमधील सर्वाधिक भयपटांपैकी एक आहे. जर तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल, तर आता तुम्ही होळीच्या लाँग वीकेंडला घरी बसून ओटीटीवर पाहू शकता. हा चित्रपट प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार आणि एमएक्स प्लेयरवर पाहता येईल.

अंधघारम

Andhaghaaram on OTT : २०२० मध्ये रिलीज झालेला ‘अंधघारम’ हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. तामिळ भाषेत रिलीज झालेला हा एक उत्तम भयपट होता. तुम्हाला भयपट आवडत असतील तर हा सिनेमा नक्की पाहा. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. विघ्नराजन यांनी केले आहे. त्याचबरोबर अर्जुन दास, विनोद किशन, पूजा रामचंद्रन आणि कुमार नटराजन यांच्यासह अनेक स्टार्स यात आहेत. सिनेमात एक अंध ग्रंथपाल, एक निराश क्रिकेटर आणि निराश मानसोपचारतज्ज्ञ यांची कथा दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

12 ‘o’ Clock

राम गोपाल वर्मा दिग्दर्शित हा २०२१ साली प्रदर्शित झालेला सस्पेन्स थ्रिलर हॉरर चित्रपट आहे. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, फ्लोरा सैनी, मानव कौल, कृष्णा गौतम आणि मकरंद देशपांडे यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

मणिचित्राथजू

Manichitrathazhu on OTT : भयपटांची चर्चा होत असेल आणि त्यात दाक्षिणात्य चित्रपटांची नावं नसतील, असं शक्य नाही. तर या यादीत एक नाव मल्याळम चित्रपटाचं आहे. मणिचित्राथजू असं या चित्रपटाचं नाव आहे. हा गाजलेल्या मल्याळम भयपटांपैकी एक आहे. ‘चंद्रमुखी’ आणि ‘भूल भुलैया’ सारखे चित्रपट याच सिनेमापासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं. शोभना, मोहनलाल आणि सुरेश गोपी यांच्यासह अनेक स्टार्स या सिनेमात होते. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

महल

Mahal on OTT: या यादीत एका जुन्या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट म्हणजे महाल होय. अशोक कुमार आणि मधुबाला या चित्रपटात होते. यात अशोक कुमार यांच्यासमोर एक अनोळखी आणि रहस्यमय महिला येते, त्यांची प्रेयसी असल्याचं सांगते. त्यानंतर जे घडतं ते पाहून तुम्ही चक्रावून जाल. हा हॉरर चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

Story img Loader