माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांना खुपणाऱ्या काही गोष्टींबद्दल भाष्य केलं. तर, त्यांच्याबद्दल खुपणाऱ्या गोष्टी त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकरने सांगितल्या. त्याबद्दल त्यांनी उत्तरं दिली. क्रांतीने त्यांच्या लग्नानंतरचा एक किस्सा सांगितला. नेमका काय आहे तो किस्सा, जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”

क्रांती म्हणाली, “आमचं नवीन लग्न झालं होतं. मी गाडी घेऊन एका वनवेमध्ये घुसले होते, मला बोर्डच दिसला नव्हता. माझ्याकडून चूक झाली होती, पुढे पोलीस उभे होते. मला वाटलं ते मला पकडणार म्हणून मी समीरला फोन केला, मला वाटलं आपला नवरा एवढा मोठा ऑफिसर आहे, आपण फोन करुया असा विचार करून मी फोन केला. त्याला मी सगळं सांगितलं, मग तो म्हणाला, ‘कुठे आहेस, काय केलंय तू?’ मी म्हटलं वनवेमध्ये शिरलेय मला बोर्ड दिसला नव्हता. तो म्हणाला, ‘किती दंड आहे?’ मी म्हटलं असेल १ हजार, दीड हजार मला माहीत नाही. मग तो म्हणाला, ‘दंड भर आणि तिथून निघ. अशा फालतू गोष्टींसाठी मला परत फोन नाही करायचा.’ त्या दिवसापासून आजपर्यंत मी नियमांचं पालन करून जगतेय.”

शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”

क्रांतीने सांगितलेल्या या किस्स्यावर समीर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आपल्या देशात कायदे आहेत. तुम्ही सिग्नल मोडलंय किंवा नो एंट्रीमध्ये गेला आहात हा गुन्हा नाही, पण बेकायदेशीर आहे. म्हणून तुम्ही नियम मोडल्यावर ‘माझा नवरा अॅडिशनल कमिश्नर आहे किंवा आयआरएस अधिकारी आहे हे सांगणं योग्य वाटत नाही.’ मी कधी टोल नाक्यावर जातो, तर ओळखपत्र दाखवत नाही. फक्त १००-१५० रुपयांसाठी मी भारत सरकारचं माझं आयकार्डचं नाव खराब करणं मला बरोबर वाटत नाही. मी टोल भरतो आणि जातो. कशाला हवाय व्हीआयपी टॅग? कोण आहात तुम्ही? कशाला माज करायचा. अखेरीस तुम्ही फक्त एक सरकारी कर्मचारी आहात. तेच मी तिला सांगितलं की माझं नाव कुठेही वापरू नकोस. मी अधिकारी आहे ते ठिक आहे. नियम मोडले असतील तर दंड भर. त्या घटनेनंतर आजपर्यंत तिने त्या कारणांसाठी मला फोन केलेला नाही.”

प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, परदेशात सुट्टीवर गेली असताना घडली घटना

दरम्यान, यावेळी बोलताना समीर वानखेडे यांनी तरुण पिढीला ड्रग्जसारख्या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. अमली पदार्थांसाठी जे पैसे लोक मोजतात, त्याचा वापर आपल्याच देशाविरोधात कारवाईसाठी वापर होतो, त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहायला हवं, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When sameer wankhede told wife kranti redkar not to use his name after breaking rules hrc