अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. काही वर्षांपूर्वीच श्वेताने ओटीटी पदार्पण केलं होतं. त्यावेळी तिची वेब सीरिज आली होती ‘हम तुम और देम’. झी ५ वर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. या वेब सीरिजमध्ये श्वेताने अभिनेता अक्षय ऑबेरॉयबरोबर इंटीमेट सीन्स दिले होते. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. पण हे सीन दिल्यानंतर श्वेता व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून रडली होती. या सीन्सचा आणि वेब सीरिजचा किस्सा श्वेताने एका मुलाखतीत सांगितला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वेता तिवारीने जेव्हा हे इंटीमेट सीन शूट केल्यानंतर तिला वाटत होतं की तिने काही चूक केली आहे. असे सीन शूट केल्यानंतर ती घाबरून जात असे आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्वतःला बंद करून रडत बसत असे. याचा खुलासा तिने ही सीरिज संपल्यानंतर तिने एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला होता. ज्या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं, “मी या सीरिजचा भाग असल्याने स्वतःला भाग्यवान समजते. फक्त वेगळ्या कथेसाठीच नाही तर या सीरिजमुळे मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास मदत झाली. मी केस कापले, इंटीमेट सीन शूट केले. मला वाटायचं की असे सीन शूट करण्याचं धाडस माझ्यात नाही. मी प्रत्येक दिवशी रडत असे.”

आणखी वाचा- “आयुष्यात केलेल्या चुकांचे परिणाम…” वैवाहिक आयुष्याबद्दल श्वेता तिवारीनं व्यक्त केली खंत

श्वेता तिवारीला जेव्हा विचारण्यात आलं की इंटीमेट सीनवर तिची मुलगी पलक तिवारीची काय प्रतिक्रिया होती? तेव्हा ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “मी खूप घाबरले होते. प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर मला भीती वाटत होती. मी क्रिएटीव्ह टीमला कॉल करून विचारलं की हे सगळं काय आहे? मला हा ट्रेलर अजिबात आवडलेला नाही. मला समजत नव्हतं की मी हे असं माझी आई, मित्रपरिवार आणि मुलांना कसं दाखवू. त्यानंतर मी माझ्या मुलीला व्हिडीओ पाठवला आणि तिला म्हटलं की यावर तुझं प्रामाणिक मत मला हवं आहे. त्यावर ती म्हणाली- व्वा आई, हे खूपच उत्तम आणि दमदार आहे.”

आणखी वाचा-“पुरुषांसाठी नेहमीच…”, बॉलिवूडबाबत शर्मिला टागोर यांचं मोठं विधान, अमिताभ बच्चन यांचाही केला उल्लेख

श्वेता तिवारीने याच मुलाखतीत पुढे सांगितलं की, मुलीची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तिने पुन्हा क्रिएटीव्ह टीमला कॉल करून त्यांची माफी मागितली होती. याशिवाय श्वेताने हाही खुलासा केला की, जेव्हा या वेब सीरिजची स्क्रिप्ट तिच्याकडे आली होती तेव्हा तिने याबाबत मुलगी पलकला सांगितलं होतं. मुलीच्याच सांगण्यावरून श्वेताने या वेब सीरिजमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. पलकने श्वेताला समजावलं होतं की, “कथेची गरज असल्यास ऑनस्क्रीन किसिंग सीन्स देण्यात चुकीचं काहीच नाहीये.”

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When shweta tiwari cry after shoot intimate scene and ask daughter for fair opinion on it mrj