‘द काश्मीर फाइल्स’नंतर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर इतिहास रचला. १५ ते २० कोटींच्या बजेटमधल्या या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली. वादग्रस्त विषय आणि बेधडक मांडणीमुळे हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती असा गंभीर विषय असल्याने या चित्रपटावर बरीच टीकाही झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेवढी टीका या चित्रपटावर झाली तितकाच भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांकडून या चित्रपटाला मिळाला. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन, निर्माते विपुल अमृतलाल शाह तसेच यातील मुख्य अभिनेत्री अदा शर्मा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर एकत्र येऊन यातून गेलेल्या मुलींना जगासमोर आणून विरोध करणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर दिलं. एकूणच ‘द काश्मीर फाइल्स’नंतर ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट त्याला मिळालेल्या राजकीय वळणामुळे चर्चेत होता.

आणखी वाचा : रेखा यांना अमिताभविषयी ‘तो’ प्रश्न कसा विचारला? सिमी गरेवाल यांनी जयललितांचा उल्लेख करत दिलेलं उत्तर

५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण अद्याप हा चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झालेला नाही. तब्बल ५ महीने उलटून गेले तरी या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. सर्वसाधारणपणे चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ४ आठवड्यांनी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतो. परंतु अजूनही हा चित्रपट ओटीटीवर आला नसल्याने बरेच लोक खोळंबले आहेत.

मध्यंतरी हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार अशी चर्चा होती, पण त्यानंतर ही बातमी खोटी ठरली. हा चित्रपट अतिशय संवेदनशील विषयावर बेतलेला असल्याने कोणतेही ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नसल्याचीही बातमी समोर आली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी हा चित्रपट ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईल अशी चर्चाही झाली, परंतु त्यानंतरही याबद्दल कुठेही नवीन माहिती आलेली नाही.

नुकतंच ‘जागरण इंग्लिश’ची संवाद साधताना अभिनेत्री अदा शर्माने याबद्दल माहिती दिलेली आहे. अदाच्या सांगण्यानुसार ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट या वर्षाअखेरीपर्यंत ओटीटीवर पाहायला मिळेल. अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the kerala story is not available on ott platform after five months avn
Show comments