‘यो यो हनी सिंग : फेमस’ या डॉक्युमेंटरी फिल्मची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या फिल्मद्वारे भारतीय हिप-हॉप स्टार हनी सिंगचे जीवन आणि करिअर उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोझेस सिंग यांनी केले आहे. ऑस्कर पुरस्कारविजेत्या निर्माता गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसद्वारे ‘यो यो हनी सिंग : फेमस’ची निर्मिती करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या डॉक्यु-फिल्ममध्ये हनी सिंगच्या आयुष्याचा प्रवास दाखविला जाणार आहे. हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंग आहे. त्याला मिळालेले यश आणि त्यानंतरचा त्याच्या आयुष्यातील प्रवास या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.

हेही वाचा…पुष्पा-श्रीवल्लीचा रोमान्स घरबसल्या पाहता येणार, Pushpa 2 ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

सिख्या एंटरटेन्मेंटचे निर्माते गुनीत मोंगा आणि अचिन जैन यांनी या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “यो यो हनी सिंग : फेमस’द्वारे आम्ही त्याच्या कथेतील खऱ्या पैलूंना उजाळा देत आहोत. त्याला मिळालेल्या यशापासून ते त्याचा संघर्ष आणि यशस्वी पुनरागमनापर्यंतचा हा प्रवास त्याची जिद्द, नवी सुरुवात आणि प्रामाणिक सत्य यांचा अनुभव देतो.”

कुठे आणि कधी पाहता येणार हनी सिंगची डॉक्यू-फिल्म

हनी सिंगवरील ‘यो यो हनी सिंग : फेमस’ ही डॉक्यू-फिल्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ही डॉक्यू-फिल्म २० डिसेंबर २०२४ पासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

हेही वाचा…Pushpa 2: अल्लू अर्जुनशी एकदाही भेट नाही, तोंडात कापूस ठेऊन डबिंग अन्…; श्रेयस तळपदेने सांगितला अनुभव, म्हणाला…

हनी सिंगवरील डॉक्यू-फिल्मचे दिग्दर्शक मोझेस सिंग म्हणाले, “हनी सिंगने या एका आयुष्यात इतके काही अनुभवले आहे, जे अनेक आयुष्यांतही क्वचितच घडतं. या चित्रपटामध्ये प्रेम, दु:ख, कुटुंब, यश, अपयश, मानसिक आरोग्य व प्रसिद्धी यांचा समावेश आहे. हा चित्रपट त्याच्या प्रवासाच्या अनेक टप्प्यांवर प्रकाश टाकतो आणि भारतीय हिप-हॉप संस्कृतीवर झालेल्या त्याच्या क्रांतिकारी प्रभावाचे दर्शन घडवतो.”

‘यो यो हनी सिंग : फेमस’ या डॉक्यू-फिल्ममध्ये त्याच्या कुटुंबीयांचे आणि मित्रांचे किस्सेही पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाबद्दल बोलताना हनी सिंगने यापूर्वी म्हटले होते, “मी माझ्या वैयक्तिक आणि करिअरमधील समस्या माध्यमांमध्ये मांडल्या आहेत; पण कधीच मनमोकळेपणानं सर्व काही सांगितलं नाही. माझ्या चाहत्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे आणि त्यांना माझी पूर्ण कथा जाणून घेण्याचा अधिकार आहे. ही नेटफ्लिक्स डॉक्यू-फिल्म माझं जीवन, माझं बालपण आणि माझा सध्याचा संघर्ष यांचा प्रामाणिक आलेख मांडेल.”

हेही वाचा…प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवलं पतीचं आडनाव, घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाली…

हनी सिंगने यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक हिट गाण्यांना संगीत दिले आहे. त्यामध्ये ‘लुंगी डान्स’ (चेन्नई एक्स्प्रेस), ‘आता माझी सटकली’ (सिंघम रिटर्न्स), ‘आज ब्लू है पाणी पाणी’ (यारियां) या गाण्यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yo yo honey singh famous documentary to premiere on netflix date announced know more psg