सध्या सर्वत्र कंटेंट किएटर्सची हवा आहे. सोशल मीडियामध्ये झालेल्या प्रगतीमुळे या क्षेत्रात करिअर करायची संधी तरुण पिढीला मिळाली आहे. या माध्यमातील कलाकारांना सेलिब्रिटीचा दर्जा मिळत आहे. यूट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर निकुंज लोटिया खूप चर्चेत आहे. डोबिंवलीमध्ये राहणाऱ्या निकुंजने काही वर्षांपूर्वी ‘बीयुनिक’ (Beyounick) या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती. तो काही मित्रांसह दोन-तीन मिनिटांचे व्हिडीओ तयार करुन यूट्यूबवर पोस्ट करायचा. हळूहळू त्याचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. त्याचे चाहते त्याला प्रेमाने ‘निक’ असे म्हणतात.

निकच्या व्हिडीओंमधील खासियत अशी की, त्याच्या व्हिडीओच्या शेवटी गमतीदार ट्विस्ट असतात आणि ते पाहायला जास्त मजा येते. त्याच्या यूट्यूब चॅनलला ४.५५ मिलियन लोक फॉलो करतात. तो अन्य सोशल साईट्सवर देखील सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे १.९ मिलियन फॉलोवर्स आहेत. नुकताच इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत निकने त्याच्या आगामी वेब सीरिजची घोषणा केली. ‘अपना विला’ असे त्याच्या सीरिजचे नाव आहे.

आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या कांताराची हवा आता जगभरात! ‘या’ देशात होणार प्रदर्शित

या सीरिजमध्ये त्याच्यासह तुषार खैर, अतुल खर्ती अशा कलाकारांनी काम केले आहे. विवेक मेनन याने सीरिजमध्ये काम करण्याबरोबर दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. मराठमोळ्या मनमीत पेमने यामध्ये महत्त्वपूर्ण पात्र साकारले आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये निकने या सीरिजबद्दल खूप उत्सुक असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “यूट्यूबच्या विश्वाबाहेरची ही आमची पहिली वेब सीरिज आहे. आम्ही तयार केलेल्या एका मिनिटाच्या व्हिडीओंना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मग आम्ही एका मिनिटावरुन आठ-दहा मिनिटांवर गेलो. आता २५-३० मिनिटांची ही सीरिज घेऊन येत आहोत. हा प्रवास खूप जास्त आनंददायी होता. लोकांना आमचे काम आवडत आहे. या सीरिजच्या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर आमची टीम पुन्हा एकत्र आली.”

आणखी वाचा – ‘बिग बॉस १६’मध्ये करण जोहर दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत; ‘या’ कारणामुळे झाले सलमानचे शूटिंग रद्द

‘अपना विला’ ही दोन बेरोजगार मित्रांची गोष्ट आहे. काम मिळत नसल्यामुळे ते दोघे सुट्टीसाठी भाड्याने घेतलेला विला इतरांना भाड्याने देतात. पाच भागांची ही सीरिज अ‍ॅमेझॉन शॉपिंग अ‍ॅपवरील अ‍ॅमेझॉन मिनी टीव्हीवर १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाली आहे.

Story img Loader