प्रसिद्ध युट्यूबर व ‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता एल्विश यादव सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘एक्स’वर #ArrestElvishYadav असं हॅशटॅग कालपासून ट्रेंड होतं आहे. गुरुग्राममध्ये राहणाऱ्या लोकप्रिय युट्यूबर सागर ठाकूर उर्फ मॅक्सटर्नला बेदम मारहाण केल्याप्रकरणी एल्विशला अटक करण्याची मागणी केली जात आहे. अशातच मॅक्सटर्नने ‘एक्स’वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटनाक्रम आणि कशाप्रकारे चुकीचा एफआयआर एल्विश विरोधात दाखल केला, याविषयी मॅक्सटर्न सांगताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅक्सटर्नने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “एल्विश यादवने मला ठार मारण्याची धमकी दिली. याचे सर्व पुरावे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पण जेव्हा मी एफआयआर दाखल करायला गेलो तेव्हा एसएचओने आयपीसी १४७, १४९, ३२३ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर दाखल केला. दुर्दैवाने, हे जामीनपात्र कलम आहेत आणि हत्येच्या प्रयत्नाचा स्पष्ट पुरावा असूनही अजामीनपात्र आरोपांचा समावेश नाही.”

हेही वाचा – तितीक्षा तावडेचा पती बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार, सिद्धार्थ बोडकेचा व्हिडीओ आला समोर

पुढे मॅक्सटर्नने लिहिलं, “एफआयआरमध्ये हत्येचा आरोप का समाविष्ट करण्यात आला नाही? पैसा आणि राज्य सरकारच्या पाठिंब्याचा हा प्रभाव आहे का? हरियाणा सरकार गुन्हेगाराला संरक्षण देत आहे का? मी @DC_Gurugram, @gurgaonpolice, @anilvijminister, @mlkhattar, @anilvijminister यांना एल्विश विरुद्ध अजामीनपात्र कलमात एफआयआर दाखल करण्याची विनंती करतो. जर भविष्यात माझ्याबरोबर काही दुर्दैवी घडलं तर एल्विश यादवला जबाबदार धरले पाहिजे.” असं लिहित सागर ठाकूरने व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला आहे.

हेही वाचा – Video: “फोन बंद कर…”, सेल्फी व्हिडीओ करत असलेल्या चाहत्यावर भडकला सलमान खान; व्हिडीओ व्हायरल

नेमकं प्रकरण काय आहे?

काही दिवसांपूर्वी एल्विश यादव व मुनव्वर फारुकी एका क्रिकेट सामन्यात एकत्र दिसले होते. यावरून मॅक्सटर्नने एल्विशची खिल्ली उडवली होती. मॅक्सटर्नने ‘एक्स’वर एल्विश व मुनव्वरचे अनेक व्हिडीओ, फोटो पोस्ट करून ‘बिग बॉस ओटीटी २’च्या विजेत्या विरोधात बोलत होता. यामुळेच एल्विश भडकला. एवढंच नाही तर काही नेटकऱ्यांनी एल्विशवर अशी टीका केली की, तो स्वतःला रामभक्त, सनातनी म्हणतो आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या मुनव्वरबरोबर फिरतो. हाच वाद आता शिगेला पोहोचला आहे. याच वादावरून एल्विशने मॅक्सटर्नला बेदम मारहाण केली आहे. यामुळे आता एल्विश पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची दाट शक्यता आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtuber sagar thakur maxtern share new video and demand arreste elvish yadav pps
Show comments