वीकेंडचा काही प्लॅन नसेल तर त्यादिवशी काय करायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो. सुट्टीच्या दिवशी मनोरंजन कसं करायचं असा विचार तुम्ही करत असाल तर ओटीटी हा चांगला पर्याय आहे. ओटीटीवर अनेक विनोदी भयपट आणि झॉम्बीवर आदारित चित्रपट उपलब्ध आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या बॉलीवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीपर्यंत हॉरर किंवा सायन्स फिक्शन सिनेमे मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहेत. नुकताच ‘स्त्री २’ हा हॉरर कॉमेडी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ‘तुंबाड’ हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला आहे. तुम्हाला झॉम्बीवर आधारित चित्रपट पाहायला आवडत असतील, तर खाली दिलेल्या यादीपैकी काही चित्रपट तुम्ही पाहू शकता.

हेही वाचा…१५ ऑगस्टला प्रदर्शित झालेला चित्रपट आला OTT वर, या वीकेंडला बॅड न्यूजसह ‘हे’ सिनेमे घरबसल्या पाहता येणार

झोंबिवली

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘झोंबिवली’ हा सिनेमा अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये आहे. ‘मुंज्या’ आणि ‘काकुडा’ या हॉरर कॉमेडी सिनेमांचे दिग्दर्शन करणारे आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

ट्रेन टू बुसान

‘ट्रेन टू बुसान’ हा एक साऊथ कोरियन सिनेमा आहे. यामध्ये एका व्यक्तीला ट्रेनमध्ये झॉम्बी व्हायरसची लागण होते आणि तो हा व्हायरस ट्रेनमध्ये असलेल्या इतर लोकांमध्ये पसरवतो. हा सिनेमा तुम्हाला भीतीदायक आणि थरारक अनुभव देईल. हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध आहे.

हेही वाचा…एकाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, तर काहींनी गाजवलं बॉक्स ऑफिस; तुम्ही पाहिलेत का हे सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट?

गो गोवा गॉन

बॉलिवूडमध्येही झॉम्बीवर आधारित सिनेमे तयार झाले आहेत, आणि यात ‘गो गोवा गॉन’ या सिनेमाच नाव आघाडीवर आहे. यात सैफ अली खान, कुणाल खेमू आणि इतर अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यात भयाबरोबरच कॉमेडीचाही अनुभव तुम्हाला मिळेल. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा ‘झी ५’वर उपलब्ध आहे.

आय अ‍ॅम लीजेंड

२००७ मध्ये प्रदर्शित झालेला हॉलीवूड अभिनेता विल स्मिथच्या मुख्य भूमिकेतील ‘आय अॅम लीजेंड’ हा सिनेमा अ‍ॅक्शन हॉरर प्रकारात मोडतो. यामध्ये एका खतरनाक व्हायरसची लागण झाल्यामुळे शहरातील लोक झॉम्बी होतात, आणि विल स्मिथ त्यांच्याशी सामना करतो. हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध आहे.

हेही वाचा…IC 814 The Kandahar Hijack सीरिजवरून नवा वाद, ANI ची Netflix विरोधात याचिका; नेमकं प्रकरण काय?

रेसिडेंट इविल

‘रेसिडेंट इविल’ या सिनेमाचे आतापर्यंत सात भाग आले आहेत आणि हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय आहे. मिला जोवोविच मुख्य भूमिकेत असून, हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर पाहता येईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zombivli train to busan go goa gone zombie movies on ott check list psg