मनोरंजनसृष्टीतील पुरस्कार सोहळे फार भव्य असतात. प्रत्येक कलाकाराची त्या पुरस्कारांपैकी एकतरी पुरस्कार मिळावा अशी इच्छा असते. नुकताच फिल्मफेअर पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. रणवीर सिंगपासून क्रीती सनॉनपर्यंत कित्येक कलाकारांनी पुरस्कार मिळवले. चित्रपटसृष्टीप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून ओटीटीविश्वाशी निगडीतसुद्धा काही सोहळे आयोजित करण्यात येतात. त्यापैकी ओटीटी प्ले पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सोहळ्यात भारतीय ओटीटी विश्वातल्या गाजलेल्या चित्रपटांना आणि वेबसीरिजना पुरस्कृत करण्यात आलं. मनोरंजनसृष्टीतल्या दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. मनोज वाजपेयी, कार्तिक आर्यन, सारा अली खान, फरहान अख्तर, राम मधवानी, शुजित सरकार अशा कलाकारांनी हजेरी लावली होती. मनीष पॉल आणि गौहार खान या दोघांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उत्कृष्ट पद्धतीने केलं. स्टँड अप कॉमेडीयन जीवेशू अहलूवालियानेही त्याच्या खुसखुशीत विनोदांनी लोकांचं मनोरंजन केलं.

पुरस्कार मिळालेल्या काही विजेत्यांची नावं पुढीलप्रमाणे :
उत्कृष्ट अभिनेता : आर्या (सरपट्टा परंबराई) आणि फरहान अख्तर (तूफान)
उत्कृष्ट अभिनेत्री : विद्या बालन (जलसा) आणि तापसी पन्नू (हसीन दिलरुबा)
उत्कृष्ट विनोदी अभिनेता : जमील खान (वेबसीरिज – गुल्लक ३)
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : परंब्रता चॅटर्जी (वेबसीरिज – अरण्यक)
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : कोंकणा सेन शर्मा (वेबसीरिज – मुंबई डियारीज २६/११)
उत्कृष्ट दिग्दर्शक : राम मधवानी, विनोद रावत, कपिल शर्मा (सीरिज – आर्या २)
उत्कृष्ट वेबसिरिज : राज आणि डीके (द फॅमिलीमॅन २)
उत्कृष्ट अभिनेता (सीरिज) : मनोज वाजपेयी (द फॅमिली मॅन २)
उत्कृष्ट पदार्पण (पुरुष) : अभिमन्यु दासानी (मीनाक्षी सुंदरेश्वर)
उत्कृष्ट पदार्पण (स्त्री) : निमरत कौर (दसवी)

आणखी वाचा : “जसा ब्रह्मास्त्रमधला शिवा हा ईशाशिवाय…” आलिया आणि रणबीरने शेअर केलं त्यांच्या गोड नात्यामागचं गुपित

आणखी बऱ्याच लोकांना तसेच तंत्रज्ञान विभागातील लोकांनाही काही पुरस्कार मिळाले. विजेते ठरवण्यात दिव्या दत्ता, आदिल हुसेन, अश्विनी अय्यर तिवारी, आनंद एल राय या कलाकारांचा परीक्षक म्हणून चोख काम बजावले आहे.