‘सिंघम’, ‘वॉण्टेड’ या बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता प्रकाश राज यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. प्रकाश राज यांची दुसरी पत्नी पोनी वर्मा हिने बुधवारी मुलाला जन्म दिला.
इंडियन एक्सप्रेसच्या संकेतस्थळाशी बोलताना प्रकाश म्हणाले की, ही एक खूप छान भावना आहे. आम्ही दोघेही फार खूश आहोत. आमचं हे बाळ आमच्या आयुष्यात खूप आनंद आणि चैतन्य घेऊन येणार आहे.
तिनदा राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरणारे प्रकाश राज यांनी २०१० साली पोनी हिच्याशी विवाह केला होता. त्याआधी त्यांनी ललिथा कुमारी हिच्याशी विवाह केला होता. मात्र, त्यांचे नाते अधिक काळ टिकू शकले नाही अखेर, त्यांनी २००९ साली घटस्फोट घेतला. ललिथापासून त्यांना मेघना आणि पूजा या दोन मुली आहेत.

Story img Loader