‘हिंदू जनजागृती समिती’तर्फे ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ सीबीएफसीला पाठवलेल्या पत्रात ‘रागिणी एमएमएस-२’ चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली असून, या चित्रपटातील अभिनेत्री सनी लिओनला भारताबाहेर हुसकावून लावण्याची मागणी देखील या समितीद्वारे करण्यात आली आहे. ‘रागिणी एमएमएस-२’ या चित्रपटावर जर बंदी घालण्यात आली नाही, तर ज्या सिनेमागृहात हा चित्रपट दाखविण्यात येत आहे त्या सिनेमागृहांच्याबाहेर समितीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात येणार असल्याचे ‘हिंदू जनजागृती समिती’ने जाहीर केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यच्या आपल्या मागिणीचा जोर वाढविण्यासाठी हा चित्रपट प्रदर्शित होत असलेल्या सिनेमागृहांच्या मालकांना संपर्क साधून चित्रपटचे प्रदर्शन थांबवण्यास सांगण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे. ‘रागिणी एमएमएस-२’ चित्रपटात भारतीय संस्कृती, तिची महानता आणि हिंदू देवतांचा अवमान करण्यात आल्याचे ‘हिंदू जनजागृती समिती’तर्फे ‘सीबीएफसी’ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हिंदूंसाठी पवित्र असलेल्या श्री हनुमान चालिसाच्या पठणाने चित्रपटाची सुरूवात होत असल्याचे म्हणत समितीने लोकांमध्ये सामाजीक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यास ‘सीबीएफसी’ला जबाबदार धरले आहे. सनी लिओनने अत्तापर्यंत चित्रपटातून साकारलेल्या भूमिका या भारतीय संस्कृतीच्या महानतेला आणि मोठेपणाला छेद देणाऱ्या आहेत. सातत्याने अशाप्रकारच्या चित्रपटांना प्रदर्शनाची परवानगी मिळत असल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत आणि समाजात अश्लीलतेला प्रोत्साहन मिळत असल्याचेदेखील या पत्रात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2014 रोजी प्रकाशित
‘हिंदू जनजागृती समिती’तर्फे सनी लिओनच्या ‘रागिणी एमएमएस-२’ चित्रपटावर बंदीची मागणी
'हिंदू जनजागृती समिती'तर्फे 'सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन' सीबीएफसीला पाठवलेल्या पत्रात 'रागिणी एमएमएस-२' चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली असून...

First published on: 26-03-2014 at 12:36 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodसनी लिओनीSunny Leoneहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Outfit demands ban on sunny leones ragini mms 2%e2%80%b2 threatens stir