बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चित्रपटांची प्रसिद्धी नेहमीच हटके पद्धतीने करतो. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील तो विचारपूर्वक ठरवतो. ‘धूम ३’ च्या यशानंतर यावर्षी त्याचा ‘पी.के’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. धूमप्रमाणेच ‘पी.के’ च्या प्रदर्शनासाठी देखील त्याला ख्रिसमसचाच मुहूर्त सापडला आहे.
राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘पी.के’ मध्ये अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंग राजपूत यांच्याही भूमिका असून, हा चित्रपट ६ जूनला प्रदर्शित होणार अशी चर्चा होती. मात्र, सलमानच्या ‘जय हो’ ची प्रसिद्धी करण्यात व्यस्त असलेल्या आमिरने ट्विटर आणि फेसबुकवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरवल्याचे पोस्ट केले आहे. ” मित्रांनो, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे… यावर्षीचा ख्रिसमस…. माझा शुभ दिवस!!! जय हो !!! “, असे त्याने ट्विट केले आहे.
ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले ‘गजनी’, ‘३ इडियट्स’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘धूम ३’ हे आमिरचे तिनही चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरले आहे.

Story img Loader