‘मॅड सखाराम’ तथा ‘भगवान

श्री सखाराम बाइंडर’

Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Loksatta book mark Patriot Alexei Navalny Russian security forces
बुकमार्क: अकाली मावळलेला झुंजार तारा
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Kshitee Jog
“सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते….”, क्षिती जोग निर्माती होण्याआधी ‘असा’ करायची विचार; स्वत:च सांगत म्हणाली, “हेमंत फार हळवा होऊन…”
basti novel loksatta
तळटीपा : ये कैसी सरहदें…

।। एक सोज्वळ, आध्यात्मिक।

भरपूर कौटुंबिक नाटक।।

प्रिय सखारामबापू,

निष्कारण एका लेखकाशी बेसावधपणे खरे बोलायला गेलात आणि गोत्यात आलात. असो. झाले ते झाले. आता तरी आपल्या जीवनग्रंथाला आम्ही दाखवल्याबरहुकूम हे असले सोवळ्या रेशमी पुठ्ठ्यातले (सरळ अर्थ घ्या.) बाइंडिंग करा. भाषेला संस्कृतचे गंधविलेपन करा. आध्यात्मिक रंगसफेदी चढवा. म्हणजे परलोकाचे कोणी पाहिले आहे- पण इहलोकी तुमचे भरपूर कल्याण होईल. संस्कृती म्हणजे दाखवायचे दात हे नीट ध्यानात घ्या. आणि तसे वागा. हां हां म्हणता तुमचे काय होईल याची ही झलक आहे.

तुमचा नम्र लेखक

…पु. ल. देशपांडे यांनी विजय तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाइंडर’ या नाटकावरील संस्कृतीरक्षकांच्या तीव्र प्रतिक्रियेवर लिहिलेल्या विडंबनात्मक नाटकाची ही प्रस्तावनावजा टिपण्णी.

तेंडुलकरांनी ‘सखाराम बाइंडर’मध्ये समाजातील एका अनीतिमान घटकाचं थेट उघडंवाघडं चित्रण केलं आणि एकच गदारोळ माजला. तथाकथित संस्कृतीरक्षकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. नाटकावरील बंदीपर्यंत हे प्रकरण गेलं. या नाटकाचे निर्माते-दिग्दर्शक कमलाकर सारंग याविरुद्ध कोर्टात गेले आणि तिथे या नाटकावरील बंदी उठवली गेली. यानिमित्ताने समाजातील ढोंगी, दांभिक प्रवृत्तीविरोधात तेंडुलकरांनी ओढलेले ताशेरे अखेरीस मान्य झाले. पुढे हे नाटक मानवी वृत्तीप्रवृत्तींचं निखालस दर्शन घडवणारं म्हणून स्वीकारलं गेलं. हा सगळा पुढचा इतिहास. पण ज्या संघर्षातून त्याला प्रारंभी जावं लागलं ते वास्तव काही पुढच्या काळातही बदललेलं नाही. पु. लं.सारख्या समकालीन साहित्यिकालाही यावर व्यक्त व्हावंसं वाटावं ही निश्चितच प्रशंसनीय गोष्ट आहे. पु. लं.नी ‘मॅड सखाराम’ तथा ‘भगवान श्री सखाराम बाइंडर’ हे नाटक लिहून तेंडुलकरांच्या म्हणण्याचं एका अर्थी शर्करावगुंठित समर्थनच केलं आहे. परंतु त्यांचं हे नाटक त्याकाळी रंगमंचित मात्र झालं नाही. त्यामागची कारणं काय, या वादात पडण्यात आता काहीच हशील नाही. पण दिग्दर्शक मंगेश सातपुते यांना या नाटकाची संहिता अलीकडेच हाती लागली आणि त्यांनी ते मंचित करण्याचं धाडस आता दाखवलं आहे. एका लेखकानं दुसऱ्या लेखकाच्या कलाकृतीला दिलेली ही मन:पूत दाद आहे. आजच्या काळात हे होणं अवघड आहे. आता ‘सखाराम’सारख्या कलाकृती लिहिण्याचं धाडसच मुळात लेखक करणार नाहीत. आणि समजा, एखाद्याने ते केलंच, तर आजचे समाजमाध्यमी ट्रोलभैरव त्याला अक्षरश: फाडून खातील. सत्ताधारी तर या टोळभैरवांचंच समर्थन करतील आणि त्या लेखकाचं जगणं अशक्य करून सोडतील. इतकी भयाण परिस्थिती आज उद्भवलेली आहे. त्यामुळे समाजाला आरसा दाखवणारी नाटकं वा कलाकृती निपजणं आज मुश्कील झालेलं आहे. हे एका अर्थानं आपल्या तथाकथित आधुनिकतेचं अध:पतनच म्हणायला हवं.

हेही वाचा >>>‘बायबल’ शब्द वापरल्यामुळे करीना कपूरला कायदेशीर नोटीस, ‘त्या’ पुस्तकामुळे अडचणीत सापडली अभिनेत्री

पु. लं.नी ‘मॅड सखाराम’मध्ये तेंडुलकरांचीच सगळी पात्रं घेतली आहेत. पण त्यांना नैतिकता आणि संस्कृतीच्या सोवळ्याओवळ्यात त्यांनी या नाटकात पेश केलं आहे. सखाराम बाइंडर हा नीतिरक्षक, संस्कृतीपूजक पुस्तकांच्या बाइंडिंगचं काम करणारा अत्यंत नीतिमान गृहस्थ यात दाखवलेला आहे. तो स्त्री ही मातेसमान मानणारा आहे. पत्रिकेतल्या मंगळामुळे त्याचं लगभन होत नाही. तेव्हा किमान पोटपूजेसाठी ‘स्वयंपाकाला बाई ठेवणे आहे’ अशी जाहिरात तो देतो. पण कम्पोझिटर त्यात नको ते बदल करून स्वयंपाकाऐवजी ‘अनुरूप बाई ठेवणे आहे’ अशी जाहिरात प्रसिद्ध करतो. आणि मग सखारामकडे बायकांची रांगच लागते. आणि त्यामुळे त्याची नको ती ‘प्रसिद्धी’ होते. त्याच्या सद्हेतूलाच तडा जातो. पण नाइलाजानं सखारामाला हे कटु वास्तव गिळावं लागतं. त्यानिमित्तानं तऱ्हेतऱ्हेच्या बायकांशी त्याचा संबंध येतो. तो आपल्या परीनं त्यांचा सांभाळ करण्याचा प्रयत्न करतोही. पण या ना त्या कारणानं त्या बायका त्याला सोडून तरी जातात किंवा त्यालाच त्यांना कधी कधी निरोप द्यावा लागतो. अशाच तऱ्हेनं लक्ष्मी आणि चंपा याही त्याच्या आयुष्यात येतात. तो त्यांना मातेसमान वागवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांच्या मात्र त्याच्याकडून ‘वेगळ्या’च अपेक्षा असतात. त्यांच्या येण्यानं सखारामच्या आयुष्यात जे काही घडतं ते म्हणजे हे नाटक! त्याचे संस्कृतीरक्षणाचे आटोकाट प्रयत्न आणि त्यांच्या ‘वेगळ्या’ अपेक्षा यांचा ताळमेळ काही जमत नाही आणि शेवटी त्याला नाइलाजानं ‘भगवान श्री सखाराम बाइंडर’ बनावं लागतं.

पु. ल. देशपांडे यांनी, या नाटकाद्वारे तेंडुलकरांनी सखारामचं आयुष्य थेटपणे मांडण्याऐवजी असं संस्कृतीरक्षणाच्या शर्करावगुंठित मात्रेत लिहिलं असतं तर कदाचित समाजानं ते स्वीकारलं असतं, असं सुचवलं आहे. म्हणजे म्हणायचं तेच, पण संस्कृतीच्या साखरेत घोळवून. आपल्या दांभिक समाजाची पु. लं.नी केलेली ही चिकित्सा निश्चितच विचारार्ह आहे. एकीकडे आपण खजुराहो, कामशास्त्राचे जनक म्हणून भारतीय संस्कृतीची महती गातो आणि दुसरीकडे अश्लीलतेचा फाजील बागुलबुवाही उभा करून संस्कृतीची विटंबनादेखील करतो, हेच त्यांना यातून दाखवायचं आहे. अत्यंत उपहासात्मक पद्धतीनं हा ‘सखाराम’ त्यांनी पेश केला आहे. भारतीय समाजाची ढोंगी मानसिकता, त्यातलं परस्परद्वंद्व, दांभिकता पु. लं.नी या नाटकात थेटपणे अधोरेखित केली आहे.

दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनी पु. लं.च्या नाटकातील हा उपरोध, उपहास अत्यंत तळमळीनं बाहेर काढला आहे. पात्रांची भाषा, त्यांच्या वागण्या-बोलण्यातील विसंगती त्यांनी त्यातून ठळकपणे पेश केली आहे. या नाटकात त्यांनी रंगसूचनांमधील लेखकालाही रंगमंचावर आणून कंसातलं म्हणणंही मांडलं आहे. सखाराम, लक्ष्मी, चंपा या पात्रांच्या कथनी आणि करणीतील विरोधाभास त्यांनी ‘लक्ष्य’वेधी केला आहे. त्यातून पु. लं.ना जे म्हणायचं आहे, ते बरोब्बर पोहोचतं. संस्कृत शब्दांच्या आडून दिल्या जाणाऱ्या अस्खलित असंस्कृत शिव्या, त्यातले अश्लील अर्थ असलेले शब्द, कथित सुसंस्कृततेतील असभ्यपणा यांचा सढळ वापर यात पु. लं.नी केलेला आहेच, पण तो त्याच ताकदीनं प्रयोगातही संक्रमित होतो. त्यांतला दांभिकपणा, अश्लीलता प्रेक्षकांपर्यंत बिनचूक पोहोचते.

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी सखारामचं चाळीतलं ‘पवित्र’ घर आणि त्याच्या घरातलाच बाइंडिंगचा व्यवसाय यथातथ्यपणे उभा केला आहे. अमोघ फडके यांनी प्रकाशयोजनेतून नाटकातले विरोधाभासी मूड्स अचूक योजले आहेत. मंदार कमलापूरकर यांनी संगीतातून आध्यात्मिकता आणि छछोर गाण्यांचा मेळ छान जमवला आहे. महेश शेरला यांच्या वेशभूषेतून पात्रांचं बाह्यरूप व्यवस्थित आकारतं. अदिती दांडेकर यांनी रंगभूषेतून पात्रांना वास्तव बाह्यरूप दिलं आहे.

सुनील जाधव यांनी यातला सत्प्रवृत्त, पण तामसी सखाराम आवश्यक तो संयम राखून लीलया साकारला आहे. सोवळ्यातलं त्यांचं आध्यात्मिक बाह्यरूप आणि चिडल्यावर संस्कृतमधून ते देत असलेल्या अस्खलित शिव्या यांतून त्यांचं अवघं व्यक्तिमत्त्व उभं राहतं. एकतारीवरचं त्यांचं ‘ट्यँव ट्यँव’ करणं त्यांच्या दुभंग व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवतं. किरण राजपूत यांनी वरवर सोशीक, पण सखारामकडून ‘वेगळ्या’च अपेक्षा बाळगणारी लक्ष्मी संवादोच्चारांतून समूर्त केली आहे. सखारामने आपल्याला मातेसमान मानणं तिला मान्य नाही. आधीचे तिचे पुरुषांबद्दलचे अनुभव कथन करून ती सखारामला ‘त्या’ दृष्टीने वळवू पाहते. पण व्यर्थ! नाटकांतून सतीसावित्री, पतिव्रतेची कामं करणारी, पण बारा गावचं पाणी प्यालेली लक्ष्मी आपल्या तडकभडक वागण्या-बोलण्यातून सखारामचं पाणी पाहताक्षणीच जोखते. त्याचा वापर करून आपलं ईप्सित साध्य करायचं, हा तिचा मनसुबा. त्यासाठी प्रसंगी लक्ष्मीचाही वापर करायला तिची ना नसते. दाऊदलाही ती घोळात घेते. अनुष्का बोऱ्हाडे यांनी चंपाचा हा फणकारा आवश्यक त्या देहबोलीसह ठासून दाखवला आहे. विशाल मोरेंचा दाऊद मुस्लीम बोली, रहनसहन अंगी मुरलेला, छपरी वृत्तीचा आहे. श्रेयस वैद्या लेखकाच्या भूमिकेत सहजपणे वावरतात. प्राजक्ता पवार यात तिसरी बाई झाल्या आहेत.

‘सखाराम बाइंडर’चं हे उपहासात्मक विडंबन एका वेगळ्याच उंचीला पोहचतं, एवढं खरं.

Story img Loader