ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट भारताची महिला एथलिट पी टी उषा हिने देखील पाहिला. मिल्खा सिंग यांप्रमाणे तिही एक धावपटू आहे. धावपटूला कराव्या लागणा-या कष्टाची तिला चांगलीच जाणीव आहे. याचमुळे पी टी उषाला हा चित्रपट पाहायचा होता, असे सूत्रांनी सांगितले. ‘पय्योली एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणा-या उषाने शुक्रवारी चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच चित्रपट पाहिला.
‘भाग मिल्खा भाग’ला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला असून चित्रपटाने तीन दिवसात बॉक्स ऑफीसवर १८ कोटींच्यावर गल्ला कमवला आहे.

Story img Loader