बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटाच्या जयपूर येथील सेटवर शुक्रवारी राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. हे प्रकरण आता हळूहळू वेगळेच वळण घेत असून, यासंबंधी आता इतिहासकारही त्यांची मते मांडत आहेत. ज्या पद्मावतीच्या अपमानाचा मुद्दा उभा करून करणी सेना आणि इतर संघटना वाद उभा करत आहेत, अशा प्रकारची कोणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती, असे ज्येष्ठ इतिहासकार इरफान हबीब यांनी म्हटले आहे. पद्मावती ही पूर्णपणे काल्पनिक व्यक्तिरेखा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इरफान हबीब म्हणाले की, प्रसिद्ध लेखक मलिक मोहम्मद जायसी यांनी पद्मावती या व्यक्तिरेखेची रचना केली होती. ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. जायसी यांनी याचा आधार घेऊन एक प्रसिद्ध कादंबरी लिहिली होती. इतिहासात १५४० पूर्वी पद्मावतीचा काहीच रेकॉर्ड मिळत नाही. या व्यक्तिरेखेला १५४० नंतर रचण्यात आले. कोणत्याच इतिहासकाराने १५४० पूर्वी याचा उल्लेख केलेला नाही. या गोष्टी पूर्णपणे काल्पनिक असल्याचेही ते म्हणाले. जायसी यांनी राजस्थानच्या पार्श्वभूमीचा आधार घेऊन प्रेमकहाणीवर आधारित कादंबरी लिहिलेली. कारण, तेव्हा राजस्थान हे एक रोमॅण्टिक ठिकाण होते. राजस्थानच्या या पार्श्वभूमीवर पद्मावतीची व्यक्तिरेखा अगदी योग्य बसते. त्यामुळे त्यांनी या व्यक्तिरेखेला वास्तवदर्शी रुप देऊन सर्वांसमोर आणले. पण, या आधारावर इतिहासात बदल करणे कठीण असल्याचेही हबीब यांनी म्हटले.

संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटात राणी पद्मावती (दीपिका पदुकोण) आणि अलाउद्दीन खिलजी (रणवीर सिंग) यांच्यामध्ये प्रणयदृश्य चित्रीत करण्यात येणार असल्याचा अंदाज बांधत, नाराज झालेल्या करणी राजपूत सेनेने चित्रपटाच्या सेटवर तोडफोड केली होती. पण, इतिहासात मात्र काही वेगळेच आहे. त्यानुसार, मलिक मोहम्मद जायसी यांनी जेव्हा पद्मावतीची रचना केली तेव्हा अलाउद्दीन खिलजीचा जन्म झाला होता. १५४० मध्ये पद्मावतीची रचना करण्यात आली. राजा रतन सिंह, अलाउद्दीन खिलजी आणि रानी पद्मिनी ही केवळ पद्मावत कादंबरीमधील पात्र आहेत. इरफान हबीब यांच्या मते, या तिनही पात्रांना एकत्र आणून दिग्दर्शक केवळ एक कथा रचत आहे. ज्याचा इतिहासात काहीच उल्लेख नाही. इतिहासकाराच्या मते पद्मावतची राणी पद्मिनी हिला श्रीलंकेची राणी असल्याचे म्हटले गेले असून तिचा राजपूतांशी काहीही संबंध नसल्याचे लिहिलेले आहे.