Entertainment News Today, 27 April 2025 : सध्या बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाची पर्वणी आहे. नवे मराठी, हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ‘ग्राउंड झिरो’, ‘फुले’ हे हिंदी चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित झाले आहेत. तर मराठीमध्ये ‘झापुक झुपूक’ आणि ‘देवमाणूस’ हे दोन नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. दुसऱ्याबाजूला पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर कलाकार मंडळी संतप्त भावना व्यक्त करत आहेत. बादशाह, अरिजीत सिंह, श्रेया घोषाल यांनी त्यांचे लाइव्ह कॉन्सर्ट रद्द केले आहेत. तसंच मराठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…
Entertainment News Updates: मनोरंजनविश्वातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...
"झापुक झुपूक'चा शो माझ्यासाठी फारच खास होता...", मिलिंद गवळींची पोस्ट
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट २५ एप्रिलला झाला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या चित्रपटात इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडी कलाकार मंडळी झळकली. अभिनेत्री मिलिंद गवळी यांनी नुकताच लेक आणि जावयाबरोबर 'झापुक झुपूक' चित्रपट पाहायला. याचा अनुभव यांनी चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
"अक्षय शिंदेची हत्या ही पहलगाम मधल्या निरपराध भावांइतकीच निर्घृण…", किरण मानेंची पोस्ट, म्हणाले…
"समजा आपण त्या जागी असतो तर?", पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विशाखा सुभेदारची पोस्ट, म्हणाली, "गर्दी दिसली की…"
…म्हणून ऐश्वर्या नारकरांनी बदललं नाव, लग्नाआधी होतं 'हे' नाव
निक्की तांबोळीने सूरज चव्हाणच्या चाहत्यांसाठी केली 'ही' खास गोष्ट; म्हणाली…
Video: राखी सावंतचा बुरखा घालून व्हिडीओ, म्हणाली; "घाबरू नका, आपण सगळेजण काश्मीरला जाऊ..."
Video: "देवीआईंना संशय…", आदित्य व पारूचा 'तो' फोटो पाहून अहिल्यादेवीचा संताप अनावर; 'पारू' मालिकेत काय घडणार?
"जसं प्रेमात ब्रेकअप होतं ना, तसं हल्ली घटस्फोट …", अभिनेत्री ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "फार चुकीचं…"
'चल भावा सिटीत' मध्ये सिद्धार्थ जाधवची जबरदस्त एन्ट्री
'आता थांबायचं नाय' चित्रपट १ मेला प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने चित्रपटातील कलाकार सध्या जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. चला भावा सिटीत कार्यक्रमात 'आता थांबायचं नाय' चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवची एन्ट्री होणार आहे. यावेळी गावरान ब्रोज एकमेकांना भिडताना पाहायला मिळणार आहेत.
https://www.instagram.com/reel/DI73NFboc0F/?utm_source=ig_web_copy_link
महेश मांजरेकरांच्या 'देवमाणूस' चित्रपटावर 'झापुक झुपूक' झाला वरचढ, दुसऱ्या दिवशी केली 'इतकी' कमाई
Video: 'कोण होतीस तू काय झालीस तू'च्या पहिल्या एपिसोडचे शूटिंग करताना गिरीजा प्रभूला झाली दुखापत; अभिनेत्री म्हणाली…
रुपाली भोसलेची धनंजय पोवारसह धमाल, पाहा व्हिडीओ
'स्टार प्रवाह' वाहिनीवर नवीन शो 'शिट्टी वाजली रे' सुरू झाला आहे. शनिवार, रविवार रात्री ९ वाजता हा शो प्रसारित होत आहे. या शोमध्ये रुपाली भोसले आणि धनंजय पोवार पाहायला मिळत आहे. या दोघांचा धमाल व्हिडीओ पाहा...
https://www.instagram.com/reel/DI8Zwy_TdCR/?utm_source=ig_web_copy_link
गांजाचं सेवन करण्याच्या तयारीत असतानाच फ्लॅटवर पडला छापा, दोन प्रसिद्ध दिग्दर्शकांना केली अटक
"माझं नाव व्हॅनिटी व्हॅनवर कधी लागेल?", समीर चौघुलेंनी सांगितली आठवण, म्हणाला, "एका शाळेच्या वर्गात…"
"मी तुझ्यावर खूप प्रेम करते…", शिवानी सुर्वेची पती अजिंक्य ननावरेसाठी खास पोस्ट, म्हणाली, "हे वर्ष…"
"काही कलाकार असे आहेत, ज्यांच्याबरोबर काम करू नये…", अक्षय खन्ना वडिलांबरोबर काम न करण्याबाबत म्हणालेला…
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा सिद्धार्थ जाधव नेहमी चर्चेत असतो. मनोरंजनसृष्टीतील त्याच्या कारकिर्दीला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने भरत जाधव यांच्यासह 'आता थांबायचं नाय' चित्रपटातील सहकलाकारांनी सिद्धार्थ खास भेटवस्तू दिली.
https://www.instagram.com/p/DI8DxK6xeoS/?utm_source=ig_web_copy_link&img_index=5
Video: पहलगाम हल्ल्यावर अक्षय कुमारने पुन्हा संताप केला व्यक्त, 'केसरी चॅप्टर २'च्या स्क्रीनिंगदरम्यान म्हणाला, "त्या दहशतवाद्यांना…"
माधुरी दीक्षितबरोबरच्या इंटिमेट सीनदरम्यान विनोद खन्नांना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही अन्…; शूटिंगनंतर रडलेली अभिनेत्री
"काश्मीर भारताचा भाग…", रितेश देशमुखची पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला, "कोणताही शेजारी देश…"
इमरान हाश्मीच्या 'ग्राउंड झिरो' चित्रपटाने दोन दिवसांत कमावले 'इतके' कोटी
Ground Zero Box Office Collection Day 2: इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी १.९० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे दोन दिवसांत 'ग्राउंड झिरो' चित्रपटाने ३.५ कोटींची कमाई केली आहे.
'फुले' चित्रपटाने दोन दिवसांत किती कमाई केली? जाणून घ्या...
Phule Box Office Collection Day 2: अनंद महादेवन दिग्दर्शित 'फुले' चित्रपट १८ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण वादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून २५ एप्रिल करण्यात आली. या चित्रपटाबाबत समिक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एवढंच नव्हे तर IMDb ने या चित्रपटाला ८.८ रेटिंग दिलं आहे. पहिल्या दिवशी 'फुले' चित्रपटाने देशात २१ लाखांची कमाई केली होती. तर जगभरात २४ लाखांचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'फुले' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २६ लाखांचा व्यवसाय केला आहे. म्हणजे दोन दिवसांत चित्रपटाने ४७ लाख कलेक्शन केलं आहे.
बॉक्स ऑफिसवर बरेच मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमवत असेल तरी दुसऱ्या बाजूला मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहे. अलका कुबल यांचं 'वजनदार' नाटक अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अशाच मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...