मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे या नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. आपल्या नैसर्गिक अभिनयाने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले आहे. काही महिन्यांपूर्वी लोकप्रिय अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा अपघात झाला होता. आता वर्षा दांदळे यांची तब्येतीत सुधारणा होताना दिसत आहे. वर्षा दांदळे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

वर्षा दांदळे या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्या नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्या नेहमीच विविध फोटो टाकत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच वर्षा दांदळे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबत त्यांनी त्यांचा एक कोलाज केलेला फोटोही शेअर केला आहे.

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Tanvi Mundle
“तो असता तर आयुष्य…”, ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री वडिलांबद्दल झाली व्यक्त, म्हणाली…
Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Marathi actress Rupal Nand will appear in Tu Hi Re Maza Mitwa
ती पुन्हा येतेय! अभिजीत आमकर-शर्वरी जोगच्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेत ‘स्टार प्रवाह’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार
Deepti Naval recalls meeting Raj Kapoor
“राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला गेलेली मी एकमेव महिला…”, दिग्गज बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य
Ashwini Mahangade
“तरीही हिमतीने रणांगणावर…”, अभिनेत्री अश्विनी महांगडे फोटो शेअर करीत काय म्हणाली?

“येतील लवकरच चांगले दिवस येतील, फक्त गंमत करतेय. दिवस चांगलेच आहेत. आरामाचे… शांततेचे… आपल्या प्रियजनांसोबत…स्वप्नातील गप्पा मारण्याचे. चालणे हेच जीवन आहे आणि थांबलात की संपलात,” अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. सध्या वर्षा दांदळे यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. तसेच ही पोस्ट चांगलीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : बॉलिवूडकरांना करोनाचा विळखा, संजय कपूरच्या मुलीलाही लागण, आतापर्यंत कोणकोणते कलाकार बाधित?

दरम्यान काही महिन्यांपूर्वी वर्षा दांदळे यांच्या कारचा अपघात झाला होता. भंडारदरा येथील एका पुरस्कार सोहळ्याहून मुंबईला परत येताना त्यांच्या कारचा अपघात झाला होता. तेव्हापासून वर्षा या अंथरुणात होत्या. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. वर्षा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांची चौकशी केली होती.

वर्षा तांदळे यांनी पाहिले नं मी तुला या मालिकेत काम केले आहे. त्यांनी या मालिकेत उषा म्हणजेच अनिकेतच्या आईचे पात्र साकारले आहे. ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. त्यासोबतच वर्षा यांनी ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेत वच्छी आत्या ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच वर्षा यांनी एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केले आहे. अभिनयाबरोबरच वर्षा यांनी सवेरेंवाली गाडी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

Story img Loader