महाराष्ट्राचे वैभव असलेली पैठणी नेसणे हे आजही अनेक स्त्रियांचे स्वप्न आहे. एक पैठणी घडवण्यासाठी काही महिन्यांचा अवधी लागतो. हातमागावर बारकाईने तयार करून मग बाजारात विक्रीसाठी आलेली पैठणी घडविणाऱ्या बायकांना कधीतरी ती नेसण्याची संधीदेखील मिळत असेल का? या साध्या पण हळव्या करणाऱ्या प्रश्नावर आधारित ‘पैठणी’ ही नवी वेब मालिका १५ नोव्हेंबर रोजी झी ५ या ओटीटी माध्यमावर येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वेब मालिकेचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले असून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि ईशा सिंह मुख्य भूमिकेत आहेत. ‘पैठणी’ या वेब मालिकेबद्दल बोलताना ‘महाराष्ट्राची पैठणी हे एक आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. कार्यक्रम आणि घरगुती समारंभाच्या निमित्ताने मी असंख्य पैठणी नेसल्या आहेत आणि त्या प्रत्येक वेळी एक वेगळाच आत्मविश्वास माझ्यात जागृत झाला आहे. त्यामुळे पैठणी साडी माझ्यासाठीदेखील सर्वाधिक खास आहे. आणि जेव्हा मला समजलं या वेब मालिकेत मी करणारं काम काय आहे? तेव्हा मी येवल्याला गेले आणि हातमागावर कसं काम करायचं याचं दोन दिवसांचं प्रशिक्षण घेतलं. ते शिकताना मला जाणवलं किती नि:स्वार्थी आणि निर्मळ मनाने ती एक साडी घडवली जाते. त्यामुळे ही वेब मालिका स्त्रियांना नक्कीच आवडेल कारण यामध्ये दाखवलेला साधेपणा आणि आई-मुलीची कथा ही आपल्या अवतीभोवती घडणारी आहे’, असं मृणाल कुलकर्णी यांनी सांगितलं. या मालिकेच्या निमित्ताने मृणाल यांनी त्यांची आई वीणा देव यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. ‘मी आज जे काही आहे ते फक्त आईने केलेल्या संस्कारांमुळे. माझ्यात कलेची आवड तिने निर्माण केली. कोणतंही काम उत्तम कसं साकारलं पाहिजे हे तिने मला शिकवलं, तिलासुद्धा हा विषय फार आवडला होता, असंही मृणाल यांनी नमूद केलं.